आतातरी नगरप्रशासन कार्यरत होणार काय? जनतेचा प्रश्न?

*आतातरी नगरप्रशासन कार्यरत होणार काय? जनतेचा  प्रश्न?*

मूल,दीपक देशपांडे 

नक्की होईल:-मुख्याधिकारी यशवंत पवार यांचे आश्वासन.


लोकशाहीच्या महापर्वाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९एप्रिल रोजी पार पडले असून जनतेचा कौल ईव्हीएममध्ये बंद झाला आहे ,तो बाहेर येण्यासाठी अजून दिड महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मात्र मागील जवळपास महिनाभरापासून निवडणूक असल्यामुळे नगरपरिषदेतील कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले असल्याचे कारण पुढे करून नगरपरिषदेची अनेक कामे बंद असून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे बंदच आहे , परिणामी अनेक बांधकामे अपूर्ण असून जनता हालअपेष्टा सहनच करीत आहे.

कुठले थंड पाण्याचे यंत्र कित्येक महिन्यांपासून बंद आहे ते बंदच आहेत, त्यामुळे  उन्हाळ्यात जनतेला थंड पाणी  उपलब्ध होत नसल्याने ते नाहक त्रास सहन करावा लागत आहे ,हे यंत्र आता उन्हाळ्यात कामात नाही आले तर केंव्हा येणार अशी विचारणा जनता करीत आहे.   कुठे रस्त्याचे काम तर कुठे नाल्या ,कुठे मुत्रीघराचे काम अर्धवट पडले आहे,  ही सगळी कामे जर आता तातडीने सुरू झाली नाहीत  आणि नाल्यांची  सफाई झाली  नाही तर ती येत्या पावसाळ्यात एक गंभीर समस्या बनून पुढे आल्याशिवाय राहणार नाही असा जनतेचा आवाज आहे.

शहरातील मोकाट कुत्री आणि डुकरांचा त्रास तर आहेच पण त्याचा बंदोबस्त आता केल्या गेला नाही तर ऐन पावसाळ्यात उकिरडे आणि त्यावरच्या या कुत्रे व डुकरांच्या उपद्रवामुळे  जनतेला वेगळाच त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील वैध अवैध प्रकारांवर लक्ष ठेवणारा तिसरा डोळा आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय त्यामुळे यावरही लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्थानिक गांधी चौकात वाहतूक (सिग्नल) नियंत्रक मागील कित्येक महिन्यांपासून फक्त शोभेच्या वस्तुंप्रमाणे चौकात उभे आहेत त्यातील बिघाड दूर करून ते कार्यरत करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

लाखो रुपये खर्च करून नगरातील सौंदर्यात कवडीचीही भर न टाकणारे बंद कारंजे आपल्या अस्तित्वाची लढाई मुकपणाने लढत आहेत त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.नगर सौंदर्यीकरणाकरिता नगरातील विविध भागात उभारलेले स्ट्याच्यू आपले अस्तित्व  जपण्यासाठी  वार्डावार्डात टाहो फोडू लागले आहेत. वेगवेगळ्या वार्डात ठेवलेले बाकडे बऱ्याच ठिकाणी आपलेच गाऱ्हाणे मांडत आहेत.

तलावाच्या खोलीकरणाचा प्रश्न ,त्यानंतर सौंदर्यीकरण , अनेक वार्डातील ओपन स्पेस मधील सौंदर्यीकरणाकरिता एखाद्या मास्टर प्लॅन ची गरज आहे परंतु त्याच्या नियोजनाचा अभाव ते करु देत नाहीये.

आठवडी बाजारात अत्यावश्यक सोयीसुविधांचा अभाव , करोडोंच्या लागतीने उभारलेल्या बिनकामी ओट्यांवर केलेला खर्च त्या स्थापत्य अभियंत्याकडून व वास्तूकारांकडून वसूल करण्यात यावा ही आठवडी बाजारातील व्यावसायिकांची मागणी नगर प्रशासन व शासनाकडे पोहोचली पाहिजे ही वारंवार  केलेली विनंती  आम्ही या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यावरही नगरप्रशासनाने काय करता येईल ह्याबाबत उचित निर्णय घेणे महत्वाचे व अत्यावश्यक आहे.

नगरातील क्रीडा संकुल व जलतरण तलाव मूलमधील जनतेला कसे लाभदायक करुन देता येईल याचाही विचार करता आला तर बघायला हरकत नसावी,अशाही सुचना मूलच्या जनतेनी आमच्या चमूकडे केल्या आहेत.

नगरपरिषदेच्या अखत्यारीतील स्मशानभूमीत सोयीसुविधांची उपलब्धता कशी करता येईल ती कशी वाढवता येईल याबाबत विचारविनिमय होणेही आवश्यक आहे तसेच वनविभागाच्या सहकार्याने स्मशानभूमीत जळावू लाकडांची व्यवस्था करता येईल काय? याबाबतीत काही करता येईल तर तेही बघण्याची वेळ आली आहे.

नगरातील काही भागातील रात्रीच्या वेळेस विद्यूतदिपांची सोय करण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे , तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे नगरातील रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्ग अत्यंत खराब स्थितीत असल्याने त्याचे नव्याने बांधकाम करणे वा ते करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून तो मार्ग व्यवस्थीत करण्यासंदर्भात उचीत निर्णय घेणे. यापैकी प्रत्येक बाब ही नगरपरिषद हद्दीतील जनतेसाठी तेवढीच महत्त्वाची बाब असल्याने नगरप्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे,अशी मूल नगरातील जनतेची मागणी आहे.

नुकतेच निवडणूक समरांगणातून ती खिंड लढवत यशस्वीपणे बाहेर पडलेल्या नगराच्या प्रशासक व मुख्याधिकारी यांचे हातात असलेल्या अधिकारांचा वापर करून जनहितार्थ निर्णय घेतले जावे ही जनतेची आशा आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत.आपले सहकार्य मूलवासीय जनता कायम लक्षात ठेवेल ही ग्वाही.

ही बातमी मुख्याधिकारी यशवंत पवार यांचेकडे पोहोचताच ,  क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आम्हाला "नक्की होईल" असे आश्वासन दिले आहे.

 इतक्याच तत्परतेने  आपण सहकार्य केलेत तर मूलची जनता आपल्या स्वागतासाठी आणि अभिनंदनासाठी सदैव हातात पुष्पमाला घेऊन तयार असेल. याबाबत आमच्या मनात शंका नाही.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*




Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*