संजय फ्लेम्स मूलच्या विरोधात अखेर तक्रार दाखल !

 संजय फ्लेम्स मूलच्या विरोधात अखेर तक्रार दाखल ! 

दिनांक २मे रोजी दस्तावेजासह उपस्थित राहण्याबाबत मृदूला मोरे   तहसीलदार मूल यांनी दिल्या सुचना.

दीपक देशपांडे 

गॅस सिलिंडर वितरणाबाबत अनियमितता आणि एजन्सी चालकाच्या मनमानी ला कंटाळून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी व शोषणमुक्त सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या वतीने मूलमधील गॅस एजन्सी संजय फ्लेम्सच्या मनमानी व दोषपूर्ण व्यवस्थेबाबत एक बातमी   Ddbatmiportalm2m वर दिनांक २१/०४/२०२४रोजी 

*संजय फ्लेम्सची मनमानी!  मूलमध्ये गॅस सिलिंडरचा  काळाबाजार???*

 *एजन्सीवाले मस्त!सिलिंडर फस्त!!ग्राहक त्रस्त !!!*

https://ddbatmiportalm2m.blogspot.com/2024/04/blog-post_63.html

या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती.त्यात दि.२२/०४/२०२४च्या सायंकाळपर्यंत खुलासा मागितला होता.

ही बातमी प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी सकाळी एजन्सी धारक सुधीर मेघराजानी यांनी फोनवर आमचे सोबत संपर्क साधला आणि कंपनीकडून सिलेंडर पुरवठ्यात अनियमितता आणि एजन्सी मधील कामगारांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे कारण पुढे करत नवीन कामगारांना ग्राहकांचे निवासस्थान माहिती नसल्याचे कारण पुढे करीत दोन दिवसांचा अवधी देण्याची मागणी केली,

यावेळी आम्ही तुमच्याकडे असलेल्या सिलेंडर मागणीची आणि वितरीत झालेल्या सिलेंडरचा एक आराखडा आम्हाला सादर करण्याची मागणी केली , दूपारनंतर सुधीर मेघराजानी यांनी  पुन्हा फोन करुन  मी नागपूर वरुन बोलतोय पण हा अहवाल मूल वरुन घेऊन मी तुमच्याकडे पाठवतो असे अभिवचन दिले.

सायंकाळी संजय फ्लेम्सच्या राहूल शृंगारपवार या दुसऱ्या भागीदारांनी  कर्मचारी रोकडे मॅडम व अजून एकजण यांचेसह आमची भेट घेतली असता  त्यांनी आमच्यासमोर जो कागद ठेवला त्यात केवळ कोणत्या तारखेचे किती सिलेंडर वितरण करणे बाकी आहे एवढीच माहिती होती तेंव्हा आम्ही त्यांना दोन ऐवजी तीन दिवसांची मुदत देत संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले व गुरुवारपर्यंत वेळ दिला व‌ गुरुवारी सायंकाळी आम्हाला याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले.आणि आम्ही शुक्रवारी तहसीलदार मूल यांना हे संपूर्ण प्रकरण सोपविण्यात येईल हे स्पष्टपणे सांगितले होते.

यानंतर विविध प्रसारमाध्यमांतून ही बातमी प्रसिद्ध होतच होती,कारण हा विषयच जनतेच्या दैनंदिन जीवनात आवश्यक सोयी सुविधांमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे.

मात्र ही बाब गॅस एजन्सी धारकांनी सोयिस्करपणे नजरेआड केली,  तरीही आम्ही ग्राहक पंचायत पदाधिकारी यांनी गॅस एजन्सी ने आम्हाला अहवाल सादर केला नाही तरी मानवीय दृष्टिकोनातून अजून तीन दिवसांचा कालावधी वाढवून देताना शुक्रवारी तक्रार दाखल न करता  सोमवारी तक्रार दाखल करायची तोपर्यंत ह्यावर नजर ठेवायची असेच ठरविले होते मात्र संजय फ्लेम्सच्या वतीने याबाबत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली आहे असा अहवाल प्राप्त झालाच नाही .

अनेकांना  फोन करताच  सिलेंडर प्राप्त होते, तर अनेकांना वारंवार फोन करुनही सिलेंडर न मिळाल्याने गॅस एजन्सीत जावून सिलेंडर आणावे लागत असल्याचे दिसून येत आहे ,परिणामी आज ह्याबाबत तहसीलदार मूल मृदूला मोरे मॅडम यांचेकडे नंदकिशोर कुंभरे नायब तहसीलदार मूल यांचे समक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे पदाधिकारी यांनी दीपक देशपांडे अध्यक्ष मूल तालुका शाखा मूल यांचे नेतृत्वात निवेदन देऊन ग्राहकांना होणारा त्रास ,गॅस एजन्सी संजय फ्लेम्सच्या वतीने सुरु असलेल्या मनमानी कारभारावर अंकुश लावून सुचारु पद्धतीने नोंदणी प्रमाणे वितरण करण्यात यावे  व घरपोच सिलिंडर वितरणासाठी पत्ता मिळाला नाही ही सबब देऊन बुकिंग रद्द करता येणार नाही किंवा कामावरील माणसे नवीन  आहेत अशी कारणे देऊन  सिलेंडरचा पुरवठा थांबवता येणार नाही ,कारण एजन्सीत प्रत्येक ग्राहकांचे फोननंबरची सुद्धा नोंद आहे त्यामुळे  अशी कारणे चालणार नाहीत  असे स्पष्ट आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी आणि गॅस एजन्सी ची कारवाई यांचा मेळ घालून योग्य रितीने वितरण करण्यासाठी गॅस एजन्सी संजय फ्लेम्सच्या संचालकांना संपूर्ण दस्तावेजासह दिनांक २मे रोजी तहसील कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवूनत्यांना कळविण्यात यावे अशी सूचना तहसीलदार मृदूला मोरे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आमचे समक्षच दिली ,व त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

ग्राहकांच्या तक्रारींची योग्य वेळी दखल घेऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल ने घेतलेली दखल व त्यावर प्रशासनाने दाखवलेली तत्परता ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाचा दुवा ठरणार असल्याचे व ग्राहकाचे  शोषण थांबविण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत असंख्य पिडीत ग्राहकांनी व्यक्त केले आहे .

हे निवेदन देऊन चर्चा करताना या शिष्टमंडळात ग्राहक पंचायत मूलचे अध्यक्ष दीपक देशपांडे, अशोक मैदमवार, उपाध्यक्ष   संघटक तुळशीराम बांगरे, बादल करपे,   सहसंघटक, सचिव रमेश डांगरे , कार्यकारिणी सदस्य, परशुराम  शेंडे,मुक्तेश्वर खोब्रागडे , एकनाथ पाटील, प्रमोद मशाखेत्री आदी उपस्थित होते.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*            *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*