*संजय फ्लेम्सची मनमानी! गॅस सिलिंडरचा काळाबाजार???*

 *संजय फ्लेम्सची मनमानी!  मूलमध्ये गॅस सिलिंडरचा  काळाबाजार???*

 *एजन्सीवाले मस्त!सिलिंडर फस्त!!ग्राहक त्रस्त !!!*

*मूल, दीपक देशपांडे*


एच.पी.गॅस वितरक म्हणून  मूल तालुक्यात मागील काही वर्षांपासून संजय फ्लेम्सची नियुक्ती केल्या गेली आहे. यांचे मालक बाहेर गावी वास्तव्यास असतात आणि ही गॅस एजन्सी त्यांचे इतर साथीदार व नोकरवर्ग सांभाळतात.

गॅस सिलिंडर पुरवठा करण्यासाठी ग्राहकांनी आँनलाईन नोंदणी केली गेल्यानंतर गॅस एजन्सी ने ग्राहकांना घरपोच सिलिंडर पुरवठा करण्याची जबाबदारी गॅस एजन्सी ची आहे.

असे असताना गॅस सिलिंडर ची मागणी केल्यानंतर संजय फ्लेम्सचे वतीने तातडीने पुरवठा तर होतच नाही ,मात्र वारंवार विचारणा करुनही माणसं नाही , सिलिंडर उपलब्ध नाहीत अशी कारणे दिली जातात व दोन दिवसांत सिलिंडर पोहचेल असे उत्तर दिले जाते ,कधी दोन दिवसांत सिलिंडर पोहोचते केले जाते नाहीतर पुन्हा तेच ते उत्तर ऐकायला मिळते.

याबाबत संजय फ्लेम्सचे भागीदार यांना वारंवार सुचित करुनही ह्या प्रकारात फारसा बदल होतांना दिसत नाही. एकीकडे असा प्रकार ग्राहकांना अनुभवायला येत असतांनाच दुसरीकडे चहाटपऱ्या आणि  हाँटेलमध्ये घरगुती वापरासाठी असणाऱ्या सिलेंडर चा मुबलक प्रमाणात पुरवठा कसा काय होतं आहे हे न समजण्यासारखे असल्याने ग्राहकांनी मूल तालुका शाखा ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे तक्रार दाखल केली होती , त्यानुषंगाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने संजय फ्लेम्सचे भागीदार व संचालक कर्मचारी यांना वारंवार सुचित करुन गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्याची विनंती करण्यात आली होती , याबाबत केवळ तक्रार केली की संबंधित ग्राहकाला तातडीने सिलिंडर पुरवठा केला जातो. मात्र पुन्हा जैसे थेची परिस्थिती येते.

ग्राहकांनी मागणी केली की तातडीने सिलिंडर पुरवठा करण्याची जबाबदारी गॅस एजन्सी ची असतांनाच ग्राहकांना नाहक त्रास देण्याचा प्रकार जर गॅस एजन्सी ने बंद केला नाही आणि सिलिंडर पुरवठा नियमीत केला नाही तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने गॅस एजन्सी, संजय फ्लेम्सचे विरोधात कठोर पावले उचलावी लागतील आणि होणाऱ्या परिणामांना केवळ आणि केवळ गॅस एजन्सी चे मालक , भागीदार आणि त्यांचा कर्मचारी वर्ग जबाबदार असतील असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने स्पष्ट करण्यात आले असून याबाबत २२/०४/२०२४ सोमवारी  सायंकाळपर्यंत संजय फ्लेम्सचे वतीने स्पष्टीकरण करण्यात आले नाही तर दिनांक २३/०४/२०२४रोज मंगळवारी तहसीलदार मूल, जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर व ग्राहक संरक्षण मंत्री महा.राज्य यांचेकडे तक्रारीचे निवेदन देण्यात येणार असून संजय फ्लेम्सची  कार्यपद्धती विरोधात कार्यवाही करण्याची मागणी  करण्यात येणार आहे. असे आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने कळविण्यात आले आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*