कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक संपन्न

 कृषी  महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक संपन्न 

मूल २९: दीपक देशपांडे 


कृषी  महाविद्यालय मूल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी ग्रामपंचायत मारोडा  ता. मूल येथे संपन्न झाली. या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे “ कृषी पूरक व्यवसाय” या विषयावर चर्चा करण्यात आली. 

यामध्ये सर्वप्रथम डॉ. अर्चना बोरकर, विषयतज्ञ कीटकशास्त्र, यांनी मधुमक्षिका पालन तसेच रेशीम कीटक संगोपन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. हे व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतील असे त्यांनी सांगितले. त्यांनी वरील व्यवसायांकरीता शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सवलतींबद्दल सांगितले. तसेच येणाऱ्या उपलब्ध बाजारपेठे बद्दल माहिती दिली. यावेळेस वरील कुठलाही व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्याची पूर्णपणे माहिती घेणे व योग्य संस्थांमार्फत त्याबद्दलचे प्रशिक्षण घेणे फार गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. उद्यानविद्या  शास्त्रज्ञ  डॉ. स्वप्नील देशमुख यांनी दर्जेदार भाजीपाला व फळ रोपवाटिका कशी असावी, शेतकऱ्यांचे मागणीनुसार कुठल्या भाजीपाला व फळ पिकांची रोपे तयार करावे, त्याची लागवडीपासून ते रोपं तयार होईपर्यंत निगा कशी राखावी, त्यावर कुठल्याप्रकारचे कीड, रोग येतात त्यांचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती दिली. तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा उपयोग करून महिला बचत गटांच्या सहायाने फळे व भाजीपाला यांवर प्रक्रिया करून विविध पदार्थ जसे की, कवठाची जेली, पपई  जाम, जांभूळाच्या बियांचे चूर्ण तसेच त्याच्या गरापासून जेली, जामतयार करून आपल्या उत्पादनात वाढ करावी असे सांगितले. वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. प्रविणा बरडे यांनी भात पिकातील धसकट आणि पेंढ्या वर वाढणारया अळिंबी व त्याचे लागवड तंत्रज्ञान, विषारी व बिनविषारी अळिंबी यातील फरक, तसेच जैविक खतांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. प्रा. मोहिनी पुनसे, विषयतज्ञ कृषिविद्या , यांनी शेततळे आणि त्यामध्ये होणारे मत्स्यपालन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ‘मागेल त्याला शेततळे, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अशा महाराष्ट्र शासनच्या विविध योजनेचा शेतकर्यानी लाभ घ्यावा व आपल्या शेतात शेततळे बनवावे आणि त्यामधे मत्स्य पालन करावे  व आपले उत्पन्न वाढवावे. तसेच त्या शेततळ्यामधे केवळ मासे सोडून दुर्लक्ष न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने मस्यपालन केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. हा एक उत्तम कृषि सलग्न व्यवसाय आहे असे त्यांनी सांगितले. डॉ. प्रीती दातीर, विषयतज्ञ विस्तार शिक्षण यांनी बदलत्या हवामानामुळे पारंपारिक पिकांच्या उत्पादनात घट होत आहे त्यामुळे कृषी पूरक व्यवसाय करावे व आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. तसेच गुणवत्तापुर्वक उत्पादनांची आकर्षक जाहिरातीद्वारे विक्री केल्यास उत्पादनात नफा मिळण्यास मदत होईल असे सांगितले. याप्रसंगी डॉ. विजय राऊत कृषि विद्या शास्त्रज्ञ यांनी शेतकर्यांच्या इतर विविध प्रश्नांची उत्तरे दिली व सदर मंचाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमास एकुण ३२ शेतकरी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रीती दातीर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

असे सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*            *✍️Ddbatmiportalm2m✍️*
























Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*