संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने....

 संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने....

दीपक देशपांडे 


मूल शहरातील नामांकित आँनलाईन आपले सरकार केंद्र प्रगती काॅम्प्युटरचे वतीने आज दिनांक २३फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


मूल शहरातील प्रेस क्लब चे अध्यक्ष दीपक देशपांडे,विजय सिद्धावार, प्रकाश  चलाख , कुमुदिनी भोयर,व तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष युवराज चावरे इतर सदस्यांच्या प्रमुख  उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन सोहळा पार पडला.या सोहळ्याचे सुत्रसंचालन  व आभार प्रदर्शन प्रमोद मशाखेत्री यांनी केले.


याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयोजनाचा उद्देश उत्तम असल्याचे व कुठेतरी संतांच्या शिकवणुकीचा फायदा जनतेला करुन देण्यासाठी आजही कुणी प्रयत्न करतात आहे ही कल्पनाच कौतुकास्पद असल्याचे मत दीपक देशपांडे यांनी मांडले .

संत महंतांच्या शिकवणुकीचा खरा फायदा विदर्भाच्या विकासासाठी कसा करायचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा विचार करीत त्यांची जयंती शासकीय स्तरावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यस्तरावर मनवल्या जात नसल्याची खंत विजय सिद्धावार यांनी आपल्या वक्तव्यातून पुढे मांडली.

युवराज चावरे यांनी संतांच्या भूमीत त्यांच्या आदर्श शिकवणुकीचा विचार करीत अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल मशाखेत्री कुटुंबियांचे कौतुक करीत खऱ्या अर्थाने संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न हा स्तुत्य प्रयत्न आहे असे मत व्यक्त केले.


या शिबिराचे निमित्ताने आयुष्यमान भारत कार्ड ,आभा कार्ड, विश्वकर्मा योजना, पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना व विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना व समाजातील इतर लाभार्थ्यांना मोफत नोंदणी ,अर्ज भरुन देण्यात आले.

या शिबिरात शेकडो लाभार्थी सहभागी झाले आणि या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराचे आयोजनाचे कोडकौतुक केले गेले.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*