पत्रकार सन्मान योजनेबद्दलचा असंतोष आला उफाळून ......!

 *अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या सरकारला पत्रकारांनी धरले धारेवर* ;

*पत्रकार सन्मान योजनेबद्दलचा असंतोष  आला उफाळून ......!*                                        मुंबई, न्यूज ब्युरो 



 महाराष्ट्र विधानमंडळात जाहीर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. 

राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री 

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वर उधळीत असतांनाच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दिशेने गेले.

 सर्व घटकांना न्याय मिळाल्याचे आपण सांगताहात परंतु पत्रकारांना न्याय मिळालेला नाही,

 अशा शब्दांत जोरदार तक्रार केली.

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना तसंच पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांवरुन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला घेरलं. तसंच सरकारनं लवकरात लवकर पत्रकारांची मागणी मान्य करावी, असं विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे म्हणाले आहेत.

 त्याबरोबर सर्वच पत्रकारांनी असंतोष व्यकत करीत मे २०२३ मध्ये देण्यात आलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

 शासन निर्णय निघालेला नाही.

 शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दोन दिवसांत जी आर निघेल असे सांगितले पण दोन अधिवेशने होऊनही जी आर निघालेला नाही, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.  पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे पत्रकारांना तत्काळ न्याय देण्यासाठी जोरदार आग्रह धरला अखेर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा केली.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*