आरसा...@विनोद देशमुख -नेहरू-गांधी अन् राज्यसभा

 🍳आरसा...@विनोद देशमुख

--------------------------------------नेहरू-गांधी अन् राज्यसभा


काँग्रेसच्या राजकारणात आणि देशाच्या सत्ताकारणात जास्तीत जास्त काळ हुकमत गाजविणाऱ्या नेहरू-गांधी घराण्याच्या वारसानं राज्यसभेच्या "मागच्या दारानं" संसदेत जावं, हे योग्य झालं का ? अशी पाळी त्यांच्यावर का यावी ? काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेवर अविरोध निवडून गेल्यामुळं हे प्रश्न राजकीय अभ्यासकांना पडले आहेत आणि त्यातून काँग्रेस पक्षाच्या दु:स्थितीबद्दल अनेकांना चिंता वाटू लागली आहे.

सोनिया गांधी या नेहरू-गांधी घराण्याच्या थेट वंशज नसल्या तरी, सून आहेत आणि त्याच अधिकारातून काँग्रेसच्या कर्त्याधर्त्या आहेत. गेली २५ वर्षे त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदारसंघातून पहिल्यांदा आणि नंतर रायबरेलीतून चारदा त्या निवडून आल्या. येत्या लोकसभा निवडणुकीतही त्या तेथूनच लढतील, असं वाटत असतानाच, अचानक राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली; तीही उत्तर प्रदेशाऐवजी राजस्थानातून आणि अविरोध निवडून येत त्या पुन्हा, सहाव्यांदा खासदारही बनल्या. पण हा बदल दिसतो तेवढा सरळसाधा नाही, एवढं निश्चित😣

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत नेहरू-गांधी घराण्याचे वंशज सातत्यानं लोकसभेत निवडून आले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, मेनका गांधी, वरुण गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी (चार पिढ्यांमध्ये नऊ खासदार, तीन पंतप्रधान. तरीही ही घराणेशाही नव्हे बरं का😀) यात सर्वाधिक काळ ३० वर्षे मेनका खासदार आहेत, तर त्यांचे पती संजय गांधी फक्त पाचच महिने खासदार होते. यातील इंदिराजी, संजय, मेनका आणि राहुल एकेकदा पराभूतही झाले आहेत.

नेहरू-गांधींचे वंशज नेहमी लोकसभेतच गेले. अपवाद फक्त दोन. एक, इंदिरा गांधी अन् दोन, आता सोनिया. हो, इंदिराजी राज्यसभेच्या सदस्य होत्या. नेहरू गेल्यानंतर त्यांना लाल बहादूर शास्त्री मंत्रिमंडळात घेण्यात आल्यामुळं उत्तर प्रदेशातून त्यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात आलं. नंतर मात्र त्या लोकसभेतच राहिल्या. परंतु, त्यांचं राज्यसभेत जाणं आणि सोनियाचं प्रकरण यात फरक आहे. मंत्रिपदामुळं इंदिराजींसाठी खासदारपद अनिवार्य झालं होतं. तशी स्थिती सोनियाबाबत नाही. शिवाय, लोकसभा निवडणूकही तोंडावर आलेली आहे. असं असताना सभागृह-बदल ? कुछ तो गडबड है दया🤔

अन् त्या गडबडीचं नाव आहे- पराभवाची भीती🥺 २०२४ मध्ये रायबरेली आपल्याला पराभव दाखवू शकते, या शंकेपोटी सोनिया लोकसभेतून राज्यसभेत 'शिफ्ट' झाल्या, हे अगदी उघड आहे. २०१९ च्या निवडणुकीत अमेठीनं युवराजाला पराभवाचा पंजा मारला होता😝 (पर्यायी, केरळचा वायनाड मतदारसंघ हाताशी नसता तर राहुल यावेळी लोकसभेबाहेरच राहिले असते.) यंदा रायबरेली सुद्धा असाच धोका देऊ शकते, अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळंच हा बदल करून "सेफ गेम" खेळण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं. कॉंग्रेस आणि घमंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांवर, तसंच चाहत्यांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमुख नेताच असा घाबरला तर अनुयायांचं मानसिक बळ टिकेल का😩 पण वेगळं करणार तरी काय म्हणा ! मोदींनी 'खौफ'च असा निर्माण करून ठेवला आहे की, भल्याभल्यांची "पळता भुई थोडी" झालेली आहे. तेथे बुडत्या नावेतील कॉंग्रेसच्या नेत्यांचं काय घेऊन बसलात हो🤣

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. सोनिया आज ७७ वर्षांच्या आहेत. राज्यसभेची ६ वर्षांची कारकीर्द हिशेबात धरली तर ८३ वर्षे होतात. शरद पवार आजच ८४ चे आहेत. मल्लिकार्जुन खडगे ८२ चे. मोदी स्वपक्षात ७५ ची सेवानिवृत्ती राबवत असताना, इतर पक्षांनी त्याबद्दल काहीच का करू नये, हे देशातील चाणाक्ष जनता बघत आहे. एवढं लक्षात ठेवा राजेहो😜

++++++++++

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*