*वास्तविकतेचे एक अतिशय सुंदर चित्रण,*

 *वास्तविकतेचे एक अतिशय सुंदर चित्रण,* कृपया वाचा.. आणि समजून घ्या.

*दीपक देशपांडे*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️* न्यूज डेस्क.



एकदा, १० मित्र ज्यांपैकी काही अति गरीब, काही मध्यम गरीब, काही मध्यमवर्गीय होते आणि काही समृद्ध होते...

ते सर्व जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये गेले..

*१०/-₹ प्लेट प्रमाणे बिल १००/- रुपये आले..*


👉🏻हॉटेल मालकाने ठरवले की हे आपले नियमित ग्राहक असल्याने त्यांना  त्यांच्या बिलाची वाटणी "देशाच्या कर प्रणालीशी सुसंगत असेल.

अशा प्रकारे -

👉🏻पहिले "४अत्यंत गरीब"..... *मोफत*

👉🏻पाचवा 'गरीब'.................. *१₹*

👉🏻६ वा "मध्यम गरीब"…….... *३₹*

👉🏻७ वा "निम्न मध्यमवर्ग"....... *७₹*

👉🏻८ वा "मध्यमवर्ग".............. *१२₹*

👉🏻९ वा "उच्च वर्ग"................ *१८₹*

👉🏻१० वा "अतिशय उच्च वर्ग".. *५९₹*


*दहाही मित्रांना ही व्यवस्था आवडली आणि ते एकाच रेस्टॉरंटमध्ये जेवू लागले..*


👉🏻या दहा जणांना रोज येताना पाहून ढाब्याचा मालक म्हणाला - "तुम्ही माझे इतके चांगले ग्राहक आहात, म्हणून मी तुम्हाला एकूण बिलावर २० रुपये सूट देतो."




*आता प्रश्न असा आहे की या सवलतीचा लाभ सर्वांना कसा द्यायचा?* 🤔

पहिले चौघेही फुकट खात होते..🙄

👉🏻एक मार्ग म्हणजे *उर्वरित ६ जणांमध्ये मध्ये सवलतीचे २० रुपये समान रीतीने विभागणे..*

तरीही तसे करणे शक्य नव्हते, अशा परिस्थितीत पहिल्या ४ बरोबरच ५ वा देखील विनामूल्य असेल आणि ५ वा ₹२.३३ घरी घेऊन जाईल. ६ व्या घरी देखील ₹०.६७ घेईल. मोफत जेवण वगळता जाऊ शकले असते. पण रेस्टॉरंटच्या मालकाला अधिक न्याय्य मार्ग सापडला..


👉🏻 *नवीन प्रणाली अंतर्गत, आता "पहिले ५ जेवन मोफत" आहेत..*

६ व्या ने रु. ३ ऐवजी २ रुपये देणे सुरू केले.. *३३%नफा*

७ व्या ने ७₹ ऐवजी ५ ₹... *२८% नफा*

८ व्या ने १२₹ ऐवजी ९₹... *२५%नफा*

९ व्या ने १८₹ ऐवजी १४ ₹... *२२% नफा* आणि, 

१०व्या ने ५९₹ ऐवजी ४९₹ देण्यास सुरुवात केली.. फक्त *१६% नफा*


👉🏻बाहेर पडताना, ६ वा म्हणाला, *मला फक्त १ रुपये नफा झाला व त्या भांडवलदाराने १० रुपये नफा घेतला*..

👉🏻आज फुकट खाऊन आलेला तो ५वा म्हणाला की,

*त्या भांडवलदाराला माझ्यापेक्षा १० पट जास्त फायदा झाला..*

👉🏻७ वा म्हणाला, *मला फक्त २ रुपये नफा झाला आणि या उद्योगपतीने १० रुपये घेतले..*


👉🏻पहिले ४ जे फुकट खात होते ते म्हणाले, 

*तुम्हाला काहीतरी मिळाले पण आम्ही गरीब लोकांना या सवलतीचा काहीच फायदा झाला नाही..*


*हे सरकार या भांडवलदार, उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तीसाठीच काम करते..*

मारा, जाळून टाका या हरामखोराला आणि,

*सगळ्यांनी मिळून १०व्या माणसाला मारहाण केली.*

ती १० वी श्रीमंत व्यक्ती आपला उपचार करुन घेण्यासाठी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया येथे गेली..


👉🏻दुसऱ्या दिवशी तो ना त्या ढाब्यावर जेवायला आला ना भारतात परतला..

*जे ९ मित्र होते त्यांच्याकडे फक्त ४० रुपये होते आणी बिल मात्र 72 रुपये होते..* 🙄🙆🏻‍♂️🤢🥹


👉🏻मित्रांनो, *जर आपण आपल्या राज्य/देशातील श्रीमंत उद्योगपती लोकांना असेच दुषणे देत राहिलो, तर शक्य आहे की ते दुसऱ्या ढाब्यावर (दुसऱ्या राज्यात/देशात) जेवायला लागतील,*

जिथे त्यांना आपल्यापेक्षा "चांगली कर आणि रिलीफ पॅकेज सिस्टम" मिळेल..


➡️ आपल्या देशाच्या करप्रणाली, बजेट आणि रिलीफ पॅकेजची ही कहाणी आहे...

*मोफत रेशन, शिक्षण, वीज, पाणी, सायकल, लॅपटॉप, उपचार, घर या अशा फुकट च्या सवलतींमुळे लोकांमध्ये फुकटची सवय लावत आहे..*

देश अशा प्रकारे चालत नाही..

👉🏻 *जगात काहीही फुकट मिळत नाही, त्याची किंमत "कुणाला तरी" चुकवावीच लागते..*


👉🏻👉🏻 *उद्योगपती, भांडवलदार आणि मोठ्या करदात्यांना तुम्ही कितीही शिव्या दिल्या तरी याच करदात्यांच्या योगदानामुळे देश चालतो हेच सत्य आहे..*


विचार जरुर करा..

जय हिंद..

🙏🏻🙏🏻🙏🏻

यावर आलेली एक प्रामाणिक प्रतिक्रिया....

चुकीचे पद्धतीने समजावून दिले आहे.

त्यावर आलेले स्पष्टीकरण असे......

 ही मांडणी श्रीमंत गरीबीची नसुन रिझर्व्हेशनची आहे असे दिसून येते.

 १०₹ प्लेट भाव आहे. खाणारे १० आहे पण रक्कम गुंतवणूक करणारे ६ आहे.

ज्याने जेवढी गुंतवणूक केली त्याप्रमाणे त्याला सुट मिळायला पाहिजे. तरच न्याय संगत होईल.

२०₹ सुट मिळाली.

खालील प्रमाणे वाटणी होईल.

०१₹ = ००.२०₹ सुट

०३₹ = ००.६०₹ सुट

०७₹ = ०१.४० ₹ सुट

१२₹ = ०२.४०₹ सुट

१८₹ = ०३.६०₹ सुट

५९₹ = ११.८०₹ सुट

_________________

१००₹ = २०₹ सुट

२०₹ ६ लोकांत समान रितीने विभागणी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्यांनी गुंतवणूक केली नाही त्यांना वाटा देणे योग्य नाही. ईथेच दिशाभूल केलेली आहे. ज्यांनी ज्याप्रमाणे गुंतवणूक केली त्या प्रमाणात त्याला सुट मिळायला हवी.

५वा विनामुल्य नाही १₹ गुंतवलेला आहे.


नवीन प्रणालीनुसार 

ईथेच भेदभावाचे मुळ लपलेले आहे.


मित्र तेच आहे.

१०₹ प्लेट हा रेट ठरलेला आहे. गूंतवणुक रक्कम कमी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्याच मताने रक्कम कमी गुंतवणूक करायचे ठरवले. ती चुकीचे आहे.

ईथेच मैत्रीला तडा गेला आहे. 

फक्त सुट देण्याचे लालसेपोटी 

नफा आणि सुट यात फरक आहे. 

ज्यांची जेवढी गुंतवणूक तेवढा त्याला भाग मिळायला पाहिजे. पण समाजात असे चित्र दिसत नाही. गुंतवणूक नसतांनाही किंवा कमी गुंतवणूक असतांनाही जास्त लाभ घेणारे दिसत आहे.

सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणावर विशिष्ट जातींना रिझर्व्हेशन मिळते आहे. कसलाही भेदभाव न करता सर्व जातींना र्रिझर्व्हेशन मिळायला पाहिजे. 

ज्यांचा जेवढा हिस्सा आहे त्याप्रमाणे. म्हणजेच लोकसंख्येच्या आधारावर. पण असे घडून येत नाही. हे वास्तविक चित्र आहे.

 कालच्या घोषणा नंतर .....

*समझ सको तो समझो ना समझे वो अडाणी है* ,

हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*