मूलमध्ये संत रविदास जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा

 मूलमध्ये संत रविदास जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा 

दीपक देशपांडे 


शनिवार दिनांक २४/०२/२०२४  रोजी मूलमध्ये सोमनाथ मार्गावर संत रविदास जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर रमेशजी मंडाले, राहूलजी अलमस्त ,प्रेस क्लब मूलचे अध्यक्ष दीपक देशपांडे, प्रा.किरण कापगते,माजी नगरसेविका  सुनिता तुळशीराम बोलीवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना दीपक देशपांडे यांनी,संत रविदास यांच्या जयंती उत्सवाच्या आयोजनाचे स्वागत केले आणि त्यांच्या कार्याची महती विदित करतांना चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात १३७७ मध्ये एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला  आलेल्या आणि  १६२८ साली त्यांच्यावर  भ्याड  हल्ला  करुन त्यांचे जीवन  संपुष्टात  आणले गेले ,यांची माहिती दिली.

मात्र या  संतांनी आपल्या जीवनकार्याची दिडशे वर्षांची तपस्या  आणि हा काळ हिंदू धर्म रक्षणासाठी आपले आयुष्य  जगताना किती हालअपेष्टा  सहन करीत  कशाप्रकारे  समाजाच्या सेवेत खर्ची घातली होती  आणि त्यांच्या शिकवणुकीचा खरा अर्थ उमजायला पुन्हा दिडशे वर्षांचा कालावधी लागला याबाबत मार्गदर्शन केले. त्याचवेळी   संत रविदासांनी वाराणसी ते संपूर्ण भारतात भ्रमण करुन आपल्या समाजासाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी त्यांचे आयुष्य पणाला लावल्याची बाब उजागर केली.

त्यांच्या ४१ कवितेच्या ओव्या गुरु ग्रंथ साहिब या शिख धर्मीयांच्या पवित्र ग्रंथात समाविष्ट असल्याचे स्पष्ट करीत त्यांच्या महान कार्याची प्रशंसा करीत आज खऱ्या  अर्थाने त्यांचे कार्य समजून घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत धर्मरक्षणासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रदर्शित केले.

रमेशजी मंडाले यांनी संत रविदास यांच्या जीवनकार्याचा आलेख समोर ठेवत समाजात विष पेरण्याचे कार्य सुरू असून आज सजगपणे संतशिरोमणी रविदास महाराजांच्या शिकवणुकीचा अभ्यास करुन त्यांचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे व धर्मपरिवर्तनासाठी त्यांची शिकवण व कार्यपद्धती व त्यांच्या कवितांचा अर्थ समाजातील शोषीत पिडीत लोकांना पटवून देण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.

राहुलजी अलमस्त यांनी आपले विचार व्यक्त करताना ,त्यांनी अविरतपणे केलेल्या जागृतीचा  रिणाम आणि इतर धर्मियांनी  धर्मपरिवर्तनासाठी केलेल्या एकेका बाबींचा अंगिकार परिणामी समाजातील एकेका परिवारातील  सदस्य त्या धर्मपरिवर्तन  करणाऱ्यांचे आमिषांना  बळी पडलेल्या आपल्या  सहकाऱ्यांना त्यातून बाहेर काढत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घरवापसीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा     धर्मपरिवर्तनासाठी सुरु असलेल्या रस्सीखेचीत आपला समाज भूलथापांना बळी पडू नये यासाठी विविध पातळीवर एक स्वतंत्र  योजना राबविणे तसेच संतांचे विचार , लहानथोरांना पटवून  देण्याची गरज असल्याचे मत अधोरेखित केले. आणि त्यासाठी संतशिरोमणी रविदास महाराज यांच्या विचारांना , त्यांच्या कार्याला या महान संतांची शिकवण, पटवून देण्याची आवश्यकता स्पष्टपणे पटवून दिली. आज समाजात वेगवेगळ्या संतांना वेगवेगळ्या जातीधर्माच्या बंधनात अडकवून ठेवले जात असल्याने  त्यांच्या  कार्याला मर्यादित  करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत व्यक्त करीत सर्वप्रथम त्या सर्व महान संतांची पूजा करण्याची व त्यांना आपल्या मनात जागा देण्याची आवश्यकता पटवून दिली. ज्यादिवशी आपण हे कार्य मनापासून करु त्या दिवसापासूनआपल्याला   निश्चितच बदल अनुभवायला  मिळेल याची खात्री बाळगण्याचे आवाहनही केले.

प्रा.किरण कापगते यांनी आपल्या वक्तव्यातून मातृशक्तीला ह्या दिवसानिमित्त समाजात जनजागृतीचा प्रचार व प्रसार करण्याची मोठी जबाबदारी स्वीकारावी लागण्याची वेळ आली असून आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांना संस्कारांची पेरणी करुन त्यांना योग्य वळण लावते त्याप्रमाणे धर्मपरिवर्तनाच्या लढाईत  आपल्याला *यदा यदाही धर्मस्य.......... ग्लानीर्भवती  भारत:*ह्या ओळींचा अर्थ  समजून घेत धर्म रक्षणासाठी वेळोवेळी भगवंत नवीन अवतार धारण करुन पृथ्वीवर अवतार धारण करीत असतात आणि  हे कार्य  आजही सुरू असणार आहे त्यामुळे विश्वासाने आपल्या खऱ्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गाचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपल्या  कुटुंबाला व  समाजाला दिशा देत आपल्या संतमहंतांची शिकवण पटवून देण्याची आवश्यकता पटवून दिली,आणि लहान मूले त्यासाठी कशी प्रेरीत होतात हे आपल्या आचरणातून सिद्ध होत असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावली येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भिमराव इटकेलवार, तुळशीराम बोलीवार, अरुण बोलीवार, लाटेलवार व महिला सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले ,या कार्यक्रमात  ,नृत्यगानचेही आयोजन करण्यात आले होते.

सहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.त्यासाठी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*