बॅनर एक चर्चा अनेक!

 बॅनर एक चर्चा अनेक!

दीपक देशपांडे.


शाळा व्यवस्थापनाने आँनलाईन शाळा तर सुरू केल्या आहेत, 
परंतू शाळेचे शिक्षण शुल्क मात्र भरमसाठ वसुल करुन शिक्षणाचा बाजार भरवल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या विरोधात पालकांचा आवाज ऐकू येऊ लागला आहे.

याच कारणामुळे नाराज पालकाने उपरोक्त बॅनर व्हाट्सअप गृपवर टाकले आणि संतप्त पालकांच्या व्यथा आणि पालक शिक्षक समितीच्या कारभाराचे वाभाडे निघायला सुरुवात झाली.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक पालक समितीच्या सभेत पालकवर्ग अत्यल्प संख्येने उपस्थित असतो आणि असलाच तरीही तिथे चकार शब्दही न काढणाऱ्यांची संख्या अधिक असते, आणि एखाददुसरा कुणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला आपण नंतर बोलू म्हणत इथे चूप बसविले जाते.आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली जाते व याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले जाते. पालकवर्ग ते निर्णय मान्य करण्यास कटिबद्ध असतात.

साधारणपणे हा असा प्रकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. आणि आजच्या घडीला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोण कोण कसे धडपडतात आणि आपला पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात हे कोण अभिमानाने सांगतात हे सांगण्याची आवश्यकता नाही ,कारण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी चकरा मारुनही विद्यार्थी आणि पालकांना तिथे प्रवेश घेणे फारच कमीपणाचे वाटत असावे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पालकांची तर जणूकाही जबाबदारी संपल्यागतच होऊन जाते आणि अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरी शिक्षकांनी बोलावणं पाठवलं तरीही ते काही शाळेत पोहोचतच नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे या शाळांमध्ये असा प्रकार होणे शक्यच नाही, एवढं मात्र मी माझ्या मनाला समजावून सांगितले.

गृपवर ज्यांचे पाल्य अशा शाळांमध्ये आहेत त्यापैकी मोजकेच लोक प्रतिक्रिया देत होते  बाकी कदाचित दूरूनच फक्त वाचक बनून बघ्याची भूमिका घेत होते, तर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ज्यांचे पाल्य अशा शाळांमध्ये नाहीत परंतू अशा कृतीची चिड निर्माण झाली म्हणून पुढाकार घेणारी मंडळी सुद्धा होती.

चर्चेतील चेहरे आणि मुखवटे घालून काहीतरी निष्कर्ष काढला जावा अशी अपेक्षा करणारी मंडळी या चर्चेकडे डोळे लावून बसली होती.

चर्चेतील पहिला झटका दिला गेला शाळा व्यवस्थापन समितीचे वतीने ,*एकला चलो रे* ची भुमिका घेतली जाते, आणि हळूहळू त्यात भर पडली पालकवर्ग बोलतच नाही, चर्चा झाली पाहिजे तोडगा निघाला पाहिजे मग आधी पालकवर्गाची एकत्र सभा झाली पाहिजे ,मग तू पुढाकार घे,तू तू मी मी करत एकदाची जबाबदारी घेतली गेली,वेळ ठरेल सभा होणार ही भोळी आशा बाळगून आहेत बरेचजण तर काही जण ह्या चर्चेची माहिती शाळा व्यवस्थापन समिती पर्यंत हळूच पोहोचविण्याचे काम फारच बेमालूमपणे करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

चर्चा होऊन काही तरी निष्कर्ष काढला जावा , होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जावा, मुग गिळून गप्प राहून अन्याय सहन करण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी लढा देण्यासाठी प्रयत्न व्हावा यासाठी आजवर आणि अजूनही शांत बसणाऱ्यांनीही यात सहभागी झाले पाहिजे , आपल्या मनातील भावना इतरांसोबत शेअर केल्या पाहिजेत त्यामुळे कदाचित तुम्हाला फारसा फरक पडणार नसेल परंतू ज्यांना या शिक्षणाची आणि शिक्षण शुल्क कमी होण्याची खरी गरज आहे आणि एवढी अवाढव्य फीच नाही तर इतरही खर्च करण्याची तयारी नसताना केवळ आपल्या पाल्याला शिकविण्यासाठी धडपडणाऱ्या पालकांची स्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

आपण सारे समजदार आहातच त्यामुळे योग्य नियोजन करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण दाखविलेल्या या धैर्याने तोंड देण्याच्या कृतींचे मनापासून स्वागत करतो.

.........आपला निर्णय झाला आणि निघणारा तोडगा याबाबत तुमच्याही प्रतिक्रिया आणि मान्यवरांच्या सुचनांसह आपण निश्चितच भेटणार आहोत पुढिल लेखात..

 तोपर्यंत,जयहो.


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*