महाराष्ट्र राज्यातील पहिले पतंजली योगभवन उदघाटन व लोकार्पण सोहळा.

 *मूल शहरात राज्‍यातील पहिले पतंजली योगभवन उदघाटीत होत असल्‍याचा मनापासून आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार*

दीपक देशपांडे.


हजारों वर्षापासून आपल्‍या भारत देशात योगसाधना सुरू आहे. आज सर्वसामान्‍य माणूस सुध्‍दा योगसाधना करतो ही अतिशय आनंदाची बाब आहे. जगातील १७५ देशांनी २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योगदिवस साजरा करण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्र संघात मंजूरी दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे योगदान अनन्‍यसाधारण आहे. निरामय आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने योगसाधना अतिशय महत्‍वाची आहे. महाराष्‍ट्रातील पहिले पंतजली योगभवन मूल शहरात उदघाटीत करताना मला मनापासून आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मूलच्या विकासकार्यातील हा एक मैलाचा दगड ठरणार हे या वास्तूत प्रवेश केल्यानंतर लक्षात आल्याशिवाय राहणार नाही,हेच या वास्तूचे विशेष आहे,हे वेगळे सांगण्याची गरज भासणार नाही.


२८ जुलै रोजी मूल शहरात योग भवनाच्‍या लोकार्पण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मूलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, ज्‍येष्‍ठ नागरिक विजयराव चंदावार, भगवान पालकर, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, विनोद सिडाम, अनिल साखरकर, वंदना लाकडे, प्रभा चौथाले, चंद्रकांत आष्‍टनकर आदींची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मूल नगर परिषदेने ठराव पारीत करून योगभवन पतंजली योग समीतीला हस्‍तांतरीत करावे. संस्‍थेला लागणारे सर्व साहित्‍य आपण पुरविणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. योगगुरू स्‍वामी रामदेव महाराज यांना आपण दिलेल्‍या निमंत्रणानुसार ते मूल येथे आले त्‍यामुळे मूल शहरात योगभवन उभारणे औचित्‍यपूर्ण असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर यांनी केले. यावेळी श्री. विजय चंदावार, श्री. भगवान पालकर यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाला मूलचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पंतजली योगसमितीचे पदाधिकारी,  सामाजिक संस्‍था, संघटनांचे पदाधिकारी, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*