शासनाच्या शिवभोजन थालीचा लाभ गरजू पर्यंत पोहचावा

 *शासनाच्या शिवभोजन थालीचा लाभ गरजू पर्यंत पोहचावा*.

       *शालीकराम भराडी जिल्हा पुरवठा अधिकारी*

चंद्रपुर :-दीपक देशपांडे.




 कोरोना व सद्या बिकट परिस्थितीत अभाव ग्रस्त नागरिकांच्या पोटात दोन घास उपलब्ध व्हावे करीता महाराष्ट्र शासनाद्वारा शिवभोजन थाळी सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिलेली असून या सुविधेचा लाभ गरजवंतांपर्यंत पोचविण्याची संधी विकलांग सेवा संस्थेला मिळाली असून शेवटच्या घटकापर्यंत शिवभोजन सुविधा पोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन जिल्हा  पुरवठा अधिकारी श्री शालीकराम भराडी यांनी केले.त्यांनी तुकुम येथील शिवभोजन केंद्राचा शुभारंभ करताना असे आवाहन केले 

    व्यासपीठावर जिल्हा अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी श्री दांडेकर,तुंबडे, डाँ बेरशेट्टीवार नेत्रतज्ञ ,संस्थाध्यक्ष व शिवसेना शहर संघटिका वर्षा कोठेकर  ,नाट्यकलावन्त व सामाजिक कार्यकर्त्या निशा धोंगडे इत्यादींनी कार्यक्रमाचे व्यासपीठ भूषविले.

 विकलांग सेवा शिवभोजन केंद्राला संस्थापयोगी साहित्य ,कोरोना प्रतिबंधक साहित्य व फर्स्ट एड बॉक्स सह साहित्य पुरविल्याबद्दल सीमादेवी ठाकूर ,रंजना नाकतोडे व निशा धोंगडे यांचा ग्रंथ वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

    उदघाटना नंतर गरजूंना भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा कोठेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद पान्हेरकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा चहारे,पुजा राखोंडे ,अशोक खाडे खुशाल ठलाल ,देवराव कोंडेकर ,शोभा  खोडके,प्रा रुकय्या शेख, ललिता मुफकलवार इत्यादींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*