*बॅनर एक चर्चा अनेक!*

*बॅनर एक चर्चा अनेक! भाग २.* 

*संतप्त पालकांच्या व्यथा निवेदनातून प्रशासनापुढे*


दीपक देशपांडे.

शाळा व्यवस्थापनाने आँनलाईन शाळा तर सुरू केल्या आहेत, परंतू शाळेचे शिक्षण शुल्क मात्र भरमसाठ वसुल करुन शिक्षणाचा बाजार भरवल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या विरोधात पालकांचा आवाज ऐकू येऊ लागला होता मात्र तो विखूरलेला होता याच कारणामुळे नाराज पालकाने एक बॅनर व्हाट्सअप गृपवर टाकले आणि संतप्त पालकांच्या व्यथा आणि पालक शिक्षक समितीच्या कारभाराचे वाभाडे निघायला सुरुवात झाली.परिणामी बिना नेतृत्वाची एक पालक संघर्ष समिती तयार करण्यात आली आणि  आज तो आवाज आता सामुहिक स्वरुपात प्रशासनाच्या दारात निवेदन घेऊन दाखल झाला आहे. यामुळे व्यवस्थापन समिती फार गोंधळून जाईलच अशी स्थिती नाहीच,कारण याची भणक त्यांना आधीच लागलेली आहे, परंतू आपली तयारी पूर्ण करुन नेमके उत्तर काय द्यायचे याची काळजी ते नक्कीच घेतील याबाबत शंका नसावी.



प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत कदाचित ते निवेदन अधिकाऱ्यांच्या हातात पडण्यापूर्वी या व्यवस्थापन समितीच्या हातात लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,कारण पालक संघर्ष समितीचे कार्य फारच पारदर्शक आहे.हे वेगळे सांगायची गरज नाही.




पालक संघर्ष समितीचे वतीने सादर निवेदनातून मागणी केली गेलेल्या विषयावर प्रशासन, संघर्ष समिती व शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य एका व्यासपीठावर उपस्थित असावे असे ठरले.

तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी,पं.स.मूल आणि तहसीलदार मूल तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व न.प.बांधकाम सभापती न.प.मूल यांना निवेदन दिले गेले.

प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कदाचित तातडीने एका सभेचे आयोजन करेल ही आणि त्यात काही मुद्दे मान्यही केले जाऊ शकतात परंतू दोन-चार पालक या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक पालक समितीवर नियुक्तही केले जातील परंतू शाळा व्यवस्थापन समितीचे वतीने वसूल केलेले मागील वर्षी भरणा केलेले शुल्क कुणाला परत मिळेल अशी आशा बाळगणे कितपत योग्य ठरेल हे येणाऱ्या सभेतच निश्चित होणार आहे.

त्यासाठी पालक संघर्ष समितीचे वतीने आपले मुद्दे मांडताना अभ्यासपूर्ण विवेचन आणि शासनाच्या ध्येय धोरणाचा अभ्यास करून नेमक्या व्यक्तीनेच बाजू मांडण्याची आवश्यकता आहे.

प्रशासकीय अधिकारी केवळ कायद्यातील तरतुदी आहेत म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे निर्णय बरोबरच आहेत या भूमिकेतून पुढे न येता सर्वसामान्य माणसाची गरज व कोरोना संकटात सापडलेल्या विद्यार्थी व पालक यांची परिस्थिती लक्षात घेऊन एक समाजहितासाठी योग्य असणारा तोडगा घेऊन पुढे यायला हवे आहेत कारण आज काॅन्व्हेंट संस्कृतीत रोज बघायला मिळते आहे ती स्थिती अशी.....

गेले शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिक्षणात गेले. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात तरी शाळा सुरू होतील अशी पालकांना अपेक्षा होती. मात्र १६ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी शाळा बंद ऑनलाइन शिक्षण सुरू अशी परिस्थिती आहे. शाळा बंद असल्या तरी खाजगी क्लासेस मात्र सध्या सर्रास सुरू आहे. शासनाचे बंधन शाळांना असून क्लासेसवर कोणाचे नियंत्रण नाही. शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, मग खाजगी क्लासेस मध्ये होत नाही का? असा संतप्त सवाल पालकवर्ग खाजगीत उपस्थित करु लागला आहे.

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे राज्यशासनाने मार्च २०२० पासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शाळांना घरघर लागली आहे. कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी शाळा सुरू ठेवणे आवश्यक आहे. यामुळे राज्य शासनाने शाळा बंद ऑनलाईन शिक्षण हा उपक्रम सुरू केला सुरुवातीला विद्यार्थी व पालकांनी यांचे स्वागतच केले.

 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत नसले तरी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. जून २०२० ला पुन्हा नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिक्षण पध्दतीने सुरू केले . नोव्हेंबर २०२०ला नववी ते बारावी वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. तर फेब्रुवारी २०२१ ला पाचवी ते बारावी चे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. मात्र पहिली ते चौथी चे वर्ग गेल्या वर्षी सुरू होऊ शकले नाही. गेल्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू राहिले. यातील अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल नसने, रेंज नसने व इतर कारणामुळे ऑनलाईन शिक्षणापासून दूर राहावे लागले. या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही. त्यामुळे शासनाने १६जून पासून २०२१ - २०२२ हे शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. . 

शाळा बंद क्लासेस सुरू अशी सध्याची परिस्थिती आहे. शिवाय एका क्लासमध्ये विद्यार्थी भरले जातात. या क्लासेसवाल्यांना शासनाचे अथवा शिक्षण विभागाची कोणाचे बंधन नाही. शाळेत विद्यार्थी एकत्र आल्यावर कोरोना होऊ शकतो. तर क्लासेस मध्ये विद्यार्थी गेल्यावर कोरोना होणार नाही का असा प्रश्न पालकांना उपस्थित होऊ लागला आहे. गतवर्षी क्लासेस वर्षभर सुरू होते. मात्र शाळा बंद होत्या. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात क्लासेस सुरू झाले आहेत. मात्र शाळा बंद आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना कोरोना चा प्रादुर्भाव होवू शकतो क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नाही का असा संतप्त सवाल पालक उपस्थित करीत आहे.

*शाळा बंद ट्युशन क्लासेस सुरू*

*गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण न घेवू देण्याचा विचार करतय काय सरकार ...?*

*शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना होवू शकतो, क्लासेसमध्ये करोना होत नाही का ...?* असे प्रश्न पालकांना भेडसावत आहेत.

शाळा बंद आहेत ही बाब तुटपुंज्या पगारावर काॅन्व्हेंटमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना जणू लाॅटरी लागल्यागत हितकारक ठरते आहे,आणि म्हणूनच या शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या केंव्हाच्याच सुरू झालेल्या आहेत.

आँनलाईन शाळा असल्याने गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देणे त्यांच्या पालकांना अपरिहार्य झाले आहे ,शाळेचे शिक्षण शुल्क भरण्याची मारामार असतांनाही ही अत्यावश्यक बाब ठरली आहे.

आणि ज्या कारणासाठी शाळा बंद आहेत की, शाळा भरवल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो पण मग तो ट्यूशन क्लासेस मध्ये होत नाही काय? हादेखील एक संशोधनाचा विषय आहे.

कोरोना ची  लाट ओसरात आहे पण सरकार शाळा कधी सुरु करणार. मुले वर्षभर घरी राहुन नुसती शिक्षणा पासून दूर जात आहेत पण सरकार ला काहीही देणेघेणे दिसत नाही. जोपर्यंत कोरोना लाट कमी आहे  तोपर्यंत शाळा सुरु करायला पाहिजे. दुकानें, बाजारपेठ सुरु आहेत मुलं सुद्धा फिरत आहेत. त्यामुळे शाळा सुरु होणे काळाची गरज आहे. असेही मत काही पालकांनी माझ्याजवळ व्यक्त केले आहे.

*शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती,पालक संघर्ष समितीसह प्रशासनाची संयुक्त सभा नेमके कोणते आणि कसे निर्णय घेते याकडे आजच्या भेटित समोर आलेले, आणि दूरूनच डोंगर साजरे म्हणत पुढे न आलेली मंडळी नजर ठेवून असणार आहे,कारण पडद्याआड हीच मंडळी फार महत्वाची भूमिका बजावत असते,हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.

पालक संघर्ष समितीच्या 

एका सकारात्मक दिवसाची सांगता उगाच प्रश्नचिन्ह निर्माण करुन खराब करण्याची माझी इच्छा नाही,सबब,आज इथेच थांबतो. 

पुढिल भाग लवकरच?.........येऊ शकतो. 

धन्यवाद.

जय हो....

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*