आषाढस्य प्रथम दिवसे

 *आषाढस्य प्रथम दिवसे...*


दीपक देशपांडे

आषाढ महिना लागला की पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनाची आणि उन्हाच्या काहिलीच्या समाप्तीची जणू काही चाहूल लागली असल्याचे भासमान होते.

शाळेच्या दिवसांत कुठेतरी वाचलेल्या त्या कालीदासांच्या काव्यपंक्ती ,शब्द नाही आठवले तरीही आकाशातील मेघाला केलेली विनवणी आणि आपल्या मनातील भावना आपल्या प्रेयसीला पोहोचविण्यासाठी केलेले आर्जव आठविल्याशिवाय राहातच नाही.


महान संस्कृत कवी कालिदास यांचे नावे 

*आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु

वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणियं ददर्श।*

असे म्हणत कालिदास दिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. 

कालिदास म्हणजे मेघदूत आणि अजरामर काव्य  सोबतच नभ मेघांनी आच्छादिले आहे असे वातावरण निर्माण होणे ही स्थिती वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.

आज मलाही लिहायचे होते आणि मी *आषाढस्य प्रथम दिवसे* लिहिणारच होतो परंतू  दिवसभर ना नभ मेघांनी आच्छादिले ना वारा सुटला त्यामुळे कवी कालिदास यांचे स्मरण करून नभ मेघांनी आच्छादलेले दिसावे आणि वारा सुटून ते मेघ वेगाने मार्गस्थ होण्याची वाट बघत होतो.

सायंकाळपर्यंत तरी ती स्थिती दिसत नाही हे बघून मन नाराज होते मात्र आश्वस्त होते काही झाले तरी आज आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि आपल्या लेखनातून कालिदास व मेघदूत आणि अजरामर काव्य यांची साऱ्या संसाराला पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देत तो संदेश प्रत्येक प्रियकर आणि प्रेयसीच्या हृदयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य मला करता यावे, यानिमित्ताने आजच्या पिढीला पुन्हा एकदा कवी कालिदास आणि त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आणि ते जाणून घेण्याची इच्छा निर्माण करता यावी हाच एक प्रामाणिक विचार स्वस्थ बसू देत नव्हता.

सायंकाळी सूर्य मावळतीला आला आणि क्षितीजा आड जाण्यापूर्वी आकाशात ढग जमाच झाले नाहीत तर जोराने वाराही सुटला आणि त्यामुळे मेघांना गतीही आली आणि माझ्या अंतरीची इच्छा पूर्णत्वास गेलीच आणि मी लेखणी हातात घेऊन लिखाणाला सुरुवात केली.

नेमकं काय शब्दबद्ध होणार याची मलाही कल्पना नाही परंतू नव्या पिढीला कवी कालिदास कळावा नव्हे त्याकाळी त्याच्या मनातील भावना  प्रियकर प्रेयसीला कळाव्या यासाठी त्यांनी घेतलेला मेघांचा सहारा आणि व्यक्त केलेली प्रेमयाचना आजच्या मोबाईल युगातही किती महत्त्व राखून आहे .हे ओरडून नाही तर प्रेमानेच सांगायचे होते.


त्याकाळी ते दूर असूनही मनाने फार जवळ होते आणि संवादाच्या तारा जुळल्या असायच्या आणि आज २४×७ मोबाईलने संपर्कात असूनही मनाच्या तारा पूर्णपणे कां जुळवून घेता येत नाहीत याचा विचार करण्याची गरज आहे ह्याची जाणीव करून देणे आवश्यक होते.

त्यासाठी प्रत्येकाने कवी कालिदास समजून घेण्यासाठी मी वेगळे काही सांगणार नाही, तुम्ही फक्त एकदाच गुगलवर जा आणि कवी कालिदास समजून घेण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो..

जात्यावर दळण दळताना गीत गाणाऱ्या आयाबहिणी,असोत की शेतात रोवणी चे काम सुरू असताना तालासुरात गीत गाणाऱ्या महिला भगिनी असो की पोळ्याच्या आखाड्यात उतरतांना  हाणा गाणारे शेतकरी बांधव असो,आपले म्हणणे दूसऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यच करीत असतात ना? त्याच प्रमाणे आषाढाच्या पहिल्या दिवशी आपल्या मनातील भावना प्रियकर प्रेयसी एकमेकांना पोहोचविण्यासाठी या मेघांची मदत घेतात आणि म्हणूनच कवी कालिदास आजही या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व टिकवून आहेत.

आपण बरेच काही सर्च करतोच ना मग आजच्या दिवशी कवी कालिदास सर्च करा, त्यातून उलगडलेले, वा  न उलगडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आणि मनातील संशयकल्लोळ दूर करण्यासाठी सहायक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो,बघा तर मग...... जमतंय का? आणि मनातील घालमेल थांबवता येईल काय? एकदा कालिदास अभ्यासून बघाच.

*आषाढस्य प्रथम दिवसे....*

आहे तरी काय?

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*