माझं मतं

 माझं मतं

दीपक देशपांडे.

मागील कित्येक वर्षे मी सातत्याने डिजिटल मिडिया च्या माध्यमातून लिखाण करीत आहो आणि आपल्या सहकार्याने व पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांच्या डबक्यात राहून डरांव डरांव करीत ,व एका वेगळ्याच दडपणाखाली आपल्या मताला बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा त्या मताला अधिक मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी मी माझाच एक ब्लॉग ,मग वेबसाईट ,अधिक आधुनिक वेबसाईट तयार करून आपल्यासमोर माझं मतं व्यक्त करीत होतो.

हे सारं कसं व्यवस्थित सुरू असताना काहींच्या पोटात गोळा उठला आणि मग नंतर एक दोन तीन करीत अनेक जण स्पर्धा करीत जणू समरांगणात उतरल्यागत  या क्षेत्रात उतरले होते,

केवळ आपणच एकट्याने या क्षेत्रात राहाण्यापेक्षा स्पर्धा सुरू झाल्याने आम्हालाही आनंदच झाला मात्र काही काळानंतर ही स्पर्धा  *नेमकं लक्ष ठरवून* सुरू झाल्याने काही प्रमाणात त्रासही झाला मात्र याला न डगमगता आम्ही आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली होती.

ही बाब ही काही मंडळींनी एकत्र येऊन काम करत केवळ एकट्यालाच लक्ष करीत वेगवेगळ्या प्रकारे आमच्या प्रखर व सडेतोड विचारांना रोखण्यासाठी वापराचे षडयंत्र रचले,व त्यात ते यशस्वीही झाले,मात्र आमच्या कर्तव्याची आणि कर्तृत्वाची दखल घेणाऱ्या मंडळींना ही बाब लक्षात येताच त्यांनी तशी सुचनाही आम्हाला दिली होती मात्र म्हीच याकडे दुर्लक्ष केले होते.

 आमचा प्रवास मुक्तपणे सुरू असताना आणि आम्ही आमच्याच एका वेगळ्याच वैयक्तिक कारणाने याकडे लक्ष देऊ शकत नाही असे लक्षात घेऊन नेमकी संधी साधून त्याला रोखण्यात यशस्वी झाले ,हरकत नाही.

निंदकाचे घर असावे शेजारी ह्या उक्तीप्रमाणे आम्ही त्यावरही मात करण्यासाठी प्रयत्नशील आहोतच परंतू हा घालाच इतका मोठा आहे की त्यावर  उपाय शोधायला सुरुवात केली तरी किती दिवस चालणार ह्या बाबतीत निश्चित सांगता येत नाही.तोपर्यंत आम्ही थांबू नये अशी आमच्या चाहत्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन लिखाण करायला सुरुवात करीत आहोत.

कुणाला दुषणे देत बसण्यापेक्षा व कुणाला दोषी ठरविण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाला सामोरे जात आपली वाटचाल सुरू ठेवणे अधिक महत्त्वाचे समजून आम्ही हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

आपले सहकार्य,व प्रेमाची थाप सोबत घेऊन आम्ही आपल्या सेवेत रुजू होत आहोत,आमचा हा नवीन उपक्रम आपल्या सहकार्याने यशाचा नवीन पल्ला गाठायचा व आमच्या यशाच्या मैलाचा दगड ठरणार ह्याची खात्री आहेच.

आपलाच,

दीपक देशपांडे.


Comments

  1. आपल्या नविन उपक्रमास मनःपुर्वक शुभेच्छा ! आपल्या निर्भिड विचारांच्या वाटचालीस आपणांस उत्तम लाभो, हिच ईश्वर चरणी शुध्द प्रार्थना !

    ReplyDelete
  2. आपल्यासारख्या नाव व प्रसिद्धी ची अपेक्षा न करणाऱ्या माझ्या चाहत्यांमुळेच आज मी पुन्हा एकदा ठामपणे उभे राहू शकलो आहे त्यामुळे माझ्या जबाबदारी ची मला पूर्ण कल्पना आहे,मात्र आपल्या पाठिंब्यामुळे मी अधिक मोकळेपणाने व्यक्त होऊ शकणार आहोत ह्याची खात्री आहे. आपल्या मनातील भावना लक्षात घेऊन लिखाण करायला मला निश्चितच आवडेल.
    आपल्या सहकार्याची अपेक्षा होती, आहे आणि ती असल्याशिवाय मी मार्गस्थ होऊच शकत नाही.
    धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*