लसिकरणासाठी महाराष्ट्रात १५तारखेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार!

 केंद्र सरकारने १८वर्षावरील नवतरुणांसाठी १मेपासून लसिकरणाची घोषणा केली, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या सगळ्यांना मोफत लसिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडून उपलब्ध होणाऱ्या लसीच्या साठ्याबाबत पूर्ण समाधानी नसल्याने महाराष्ट्रात उद्यापासून सुरु होणाऱ्या लसिकरणाची नोंदणी करून ही तरुणाईला अजून किमान १५तारखेपर्यंत तरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे,असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.

*इंतजार का फल मिठा होता है,असे म्हणतात ना?*

बघू या ही प्रतिक्षा कधी संपणार? सगळ्यांना मोफत लसिकरण करण्याचा निर्णय कितपत यशस्वी होईल आणि तो किती कालावधी घेऊन पूर्णत्वास जाईल.

कारण एकिकडे कोरोनाची वाढती साखळी त्यामुळे बाधितांची वाढणारी संख्या रुग्णालयात जागा व औषधोपचार करण्यात येणाऱ्या अडचणी आणि तिसरी चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अजूनही ४५ते६० वयोगटातील नागरिकांचे ही लसिकरण पूर्ण झालेले नाही आणि त्यापूर्वीच तरुणाईच्या लसिकरणाची घोषणा करण्यात आली असून त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

आजच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले  की ही मोहीम १५मे नंतर सुरू केली जाणार आहे.

म्हणूनच just wait and watch....तोपर्यंत चलने दो.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*