कोरोनाचा आजही उद्रेक

 गत २४ तासात १४१५ कोरोनामुक्त, १६६७  पॉझिटिव्ह तर २८ मृत्यू

 आतापर्यंत ४२८२३ जणांची कोरोनावर मात

  ॲक्टीव पॉझिटिव्ह १६५८४

चंद्रपूर, दि. ३० एप्रिल : जिल्ह्यात मागील २४ तासात १४१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १६६७ कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून २८ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६० हजार ३१२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४२ हजार ८२३  झाली आहे. सध्या १६ हजार ५८४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ७६ हजार ७२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ११ हजार ६६२ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा आजही उद्रेक!

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर येथील ७० वर्षीय महिला व ७४ वर्षीय पुरुष, छत्रपती नगर येथील ४९ वर्षीय पुरुष, ३७ व ६१ वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर येथील ५२ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील ६२ व ७२ वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील ४३ वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील २७ वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील ६२ वर्षीय महिला, बोर्डा चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला,  भिवापूर येथील ७८  वर्षीय पुरुष.

 वरोरा तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, जिवती तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील ४८ वर्षीय पुरुष, खापरी येथील ७६ वर्षीय महिला, मासळ येथील ५० वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, तळोधी येथील ६५ वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील ५८ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील ७५ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील ७५ वर्षीय पुरुष व  ६५ वर्षीय महिला, भंडारा येथील ५८ वर्षीय महिला, सावर्ला-पवनी येथील ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९०५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ८३६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २७, यवतमाळ २७, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या १६६७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील ३८१, चंद्रपूर तालुका ८१, बल्लारपूर ११९, भद्रावती १७७, ब्रम्हपुरी ६९, नागभिड ८८, सिंदेवाही ५७, मूल ५८, सावली २६, पोंभूर्णा १९, गोंडपिपरी ४९, राजूरा १०७, चिमूर ६०, वरोरा २०५, कोरपना १४२,  जिवती ११ व इतर ठिकाणच्या १८ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.



Comments

  1. वाचकांना आपले मत नोंदवा यावे व कमेंट्स द्वारे ते आमच्यासह इतरही वाचकांना कळावे म्हणून ही सोय करण्यात आली आहे.
    बघा योग्य वेळी योग्य निर्णय, आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
    दीपक देशपांडे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*