मालधक्क्याला धक्का की मालधक्याचा धक्का?

 *दिव्याखालीच अंधार* भाग १.

सिमोलंघन.............!

मालधक्क्याला धक्का की मालधक्याचा धक्का?

मूल शहरात मागील काही दिवसांपासून एक विषय प्राधान्याने चर्चेत आला आहे, त्यांचे नाव आहे *मालधक्का*.

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीतील लोहखनिज देशातील विविध भागात पाठविण्यासाठी ह्या लोहखनिजाची वाहतूक खाणीतून रेल्वे स्टेशन पर्यंत ट्रकद्वारे आणून तेथे डंपिंग यार्ड बनवून तेथून रेल्वेने पुढिल वाहतूक करण्याचे ठिकाण म्हणजे *मालधक्का*.

रेल्वे मंत्रालयाने सुरजागड वरुन येणारे लोहखनिज वाहून नेण्यासाठी जवळचे स्टेशन म्हणून *मूल स्टेशनची* निवड केली आवश्यक ती सगळी कार्यवाही पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची वेळ आली, तोपर्यंत मूल नगरातील फारच थोड्या लोकांना याची माहिती असावी परंतू ती बाहेर पडली नव्हती की पडू दिली गेली नव्हती ? हा अभ्यासपूर्ण स्वतंत्र विषय आहे हे सांगणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

काही खाजगी कंपन्या आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गावापासून थोडे दूर व डंपिंग साठी भरपूर जागा उपलब्ध असलेल्या मूल रेल्वे स्टेशन ला डंपिंग यार्ड बनविण्यासाठी काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवात केली .ही बाब मूल रेल्वे स्टेशन ला लागून असलेल्या खेळाच्या मैदानात सकाळी सकाळी व्यायाम करायला व फिरायला येणाऱ्या नागरिकांना ही बाब लक्षात आली व शहरातील मार्नींग गृपच्या सदस्यांनी याबाबत विचार विनिमय करून या मालधक्याबाबत अधिक माहिती मिळवली व तो नागरिकांना कसा तापदायक व आरोग्याशी खेळ करणारा आहे हे पटवून देत त्याचा विरोध करण्याचे ठरविले.


मूल शहरात एक पत्रकार परिषद घेऊन त्याविरुद्ध रणशिंग फुंकले गेले आणि पाहता पाहता ही एक लोकचळवळ बनू लागली .

उर्वरित पुढिल भागात....

@ दीपक देशपांडे.

दिनांक ७/१०/२०२२.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*