मूल नगर प्रशासनाचे स्मशानभूमीतील विद्यूत व्यवस्थेकडे दूर्लक्ष?*

 *सिमोलंघन*

*मूल नगर प्रशासनाचे स्मशानभूमीतील विद्यूत व्यवस्थेकडे दूर्लक्ष?*

मागील वर्षी कमीअधिक याच दिवसांत श्रेयनामावलीत अग्रेसर असणाऱ्या एकातरी स्थानिक नेत्याला आजच्या दिवशी मूल नगरातील लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या उमा नदी किनाऱ्यावरील स्मशानभूमीकडे लक्ष द्यायला वेळ आहे काय?

स्मशानभूमीत असलेल्या विंधन विहिरी सभोवती वाढलेल्या गवतामुळे त्याचा वापर केला जातो काय?

लाखोंच्या घरात खर्च करून मागील वर्षी आरडाओरडा झाल्यावर सुरू करण्यात आलेल्या विद्यूत व्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ आहे काय?

मागील वर्षी नवीनच आलेल्या मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन साफसफाई करून घेतली होती आता दरवर्षी यांची आठवण मीच करुन द्यावी अशी तर नगरप्रशासनाची इच्छा नसेल ना?

खरं तर आता निवडणुका तोंडावर आल्या असताना या अशा छोट्या वाटणाऱ्या परंतू जनहिताच्या समस्या कुणालाच दिसू नयेत आणि त्या सुटाव्यात म्हणून प्रयत्न केला जाऊच नये ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.

नगरांत बऱ्याच समस्या असतील आणि त्या सुटाव्यात म्हणून प्रयत्न करणारेही अनेक आहेत पण गावापासून दूर असणाऱ्या या स्मशानभूमीत असलेल्या दुरावस्थेकडे कुणितरी लक्ष देणे गरजेचे आहे असे मला वाटते.

मी अकारण कुठे भटकंती करावी म्हणून कुठे फेरफटका मारायला जात नाही मात्र कुठं गेलोच आणि अव्यवस्था आढळून आली तर त्याविरोधात आवाज उठवल्याशिवाय राहातं नाही म्हणून मी समाजात वावरताना, अकारण मित्र कमी आणि शत्रू अधिक तयार करून घेतो असाच प्रकार आज घडला.

सौ.पद्मा केशवराव देशपांडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी मूलच्या स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली आणि ही अव्यवस्था आढळून आली आणि ही बाब उजागर झाली.

समस्या ही समस्या असते आणि सामाजिक हिताची समस्या नजरेसमोर आल्यानंतर त्याविरोधात चकार शब्दही न बोलता शांत राहिलो तर तो सामाजिक अन्याय ठरेल म्हणून हा लेखनप्रपंच.

खरंतर हीच तर खरी सिमोलंघनाची सुरुवात आहे.

मूल नगर प्रशासन आणि तरुण नवनियुक्त मुख्याधिकारी या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देतील ही अपेक्षा करायला हरकत नसावी ना?

चला वैचारिक सिमोलंघनाची सुरुवात करु या.


दीपक देशपांडे.

दिनांक ६/१०/२०२२.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*