मालधक्का! मालधक्क्याचा धक्का की मालधक्क्याला धक्का!!*

 *मालधक्का! मालधक्क्याचा धक्का की मालधक्क्याला धक्का!!*


*दीपक देशपांडे*


*दिव्याखालीच अंधार भाग २*

सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक व मूल येथील मालधक्का व त्याविरोधात मूल येथील पत्रपरिषदेत जे रणशिंग फुंकले गेले होते त्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली आणि मालधक्का हटाव  ही लोकचळवळ म्हणून पुढे आली आणि यात सर्वपक्षीय छोट्या मोठ्या नेतेमंडळींनी आपला सहभाग नोंदविला मात्र श्रेय नामावलीत आपले नाव पुढे यावे यासाठी *मार्निंग वाॅक गृप* सोबतच *मूल शहर बचाव संघर्ष समिती गृपची* निर्मिती झाली. या गृपची लिंक शेअर केली होती त्यामुळे उत्सुकतेपोटी अनेक जण या गृप मध्ये समाविष्ट झाले, काही जोडले गेले ,काही नवीन अॅडमीन बनवले गेले आणि नवनवीन सदस्य जोडले गेले व खरा संघर्ष सुरू झाला.

मूल येथील मार्नींग गृपच्या सदस्यांनी घेतलेली भूमिका आणि मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी मूल येथील *प्रस्तावित मालधक्का* तयार झाल्याने, लोहकण फुफ्फुसांवर घातक परिणाम करतील व  मूलच्या जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची  शक्यता  आणि मूल परिसरातील पर्यावरण प्रदुषणामुळे शेती उत्पादन व वृक्षवल्लींवर परिणाम होण्याची शक्यता आणि मोठमोठ्या ट्रकवाहतुकीमुळे वाहतूक प्रभावी होण्याची व अपघात वाढण्याची शक्यता यांवर भर देत एकप्रकारचे भितीदायक चित्र उभे केले आणि त्यामुळे हा मालधक्का इथे नकोच ही भूमिका पुढे ठेवण्यात आली.

या संघर्ष समिती च्या आवाहनाला प्रतिसाद देत मूलच्या जनतेनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आपला आक्रोश ही दाखवून दिला आणि *मूल नगरीतील एक अराजकीय अभूतपूर्व संघर्ष* अशी प्रतिक्रिया उमटली आणि इथेच राजकीय हस्तक्षेप करण्याची गरज राजकीय मंडळींच्या मनात आली असावी त्यातुनच कुणा  राजकीय हौशी लोकांनी स्थानिक आमदार खासदारांची भेट घेण्याचा सल्ला दिला , त्यामुळे आधी आमदार आणि राज्याचे प्रभावी मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट गृप सदस्यांनी घेऊन आपल्या वेदना आणि भुमिका विषद केली . त्यानुसार मंत्री महोदयांनी संघर्ष समिती सदस्यांना आश्वस्त केले की शक्य ती मदत करीत अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत एक संयुक्त सभा आयोजित करुन निर्णय घेण्यात येईल, परंतू मूलच्या जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तशा सुचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यासाठी याच बैठकीत मूल संघर्ष समितीतील एक प्रमुख आयोजक पत्रकार विजय सिद्धावार आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संध्या गुरनुले यांची जवळपासच्या भागातील जागा पाहून स्थळ निश्चित करण्यासाठी नियुक्ती सुद्धा करण्यात आली.

मंत्री महोदयांनी बोलल्याप्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या  आणि प्रत्यक्ष भेटी व पाहणी अहवाल सादर करण्यासाठी अधिकारीक स्तरावर कार्यवाही सुरू झाली आणि येथूनच एका नव्या वादाला सुरुवात झाली.

असे म्हणायला भरपूर वाव आहे.

दीपक देशपांडे,मूल.

....... उर्वरित पुढिल भागात.....

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*