* मूल तालुक्‍यातील चिखली आणि मोरवाही या गावात गेटेड साठवण बंधारे मंजूर*

*१४ कोटी ६८ लक्ष ९७ हजार रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्‍यता.*

*माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.*

चंद्रपुर m2Mन्यूजपोर्टल

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील  मूल तालुक्‍यातील चिखली आणि मोरवाही या ठिकाणी गेटेड साठवण बंधा-यांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. महाराष्‍ट्र जलसंधारण महामंडळाच्‍या दिनांक ९ मे २०२२ च्‍या आदेशान्‍वये सदर दोन गावात गेटेड साठवण बंधारे मंजूर करण्‍यात आले आहे.


 मूल  तालुक्‍यातील चिखली येथे ७ कोटी ३३ लक्ष ८० हजार रू. तसेच मोरवाही येथे ७ कोटी ३५ लक्ष १७ हजार रू. किंमतीचे गेटेड बंधारे मंजूर करण्‍यात आले आहे. या बंधा-यांच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून शेतक-यांना या माध्‍यमातुन मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे. या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन विषयक महत्‍वपूर्ण प्रकल्‍प व योजना राबविल्‍या आहे. प्रामुख्‍याने बल्‍लारपूर तालुक्‍यात १० गावांना सिंचनाची सोय उपलब्‍ध करणारी पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना, चिचडोह बॅरेज, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्‍या सहा गावांमध्‍ये पाईपलाईन द्वारे सिंचनाची सुविधा, नलेश्‍वर मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या मुख्‍य कालव्‍याचे अस्‍तरीकरण, भसबोरण लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम, पिपरीदिक्षीत लघु प्रकल्‍प विशेष दुरूस्‍तीचे काम, जानाळा लघु प्रकल्‍पाची विशेष दुरूस्‍ती, राजोली येथे माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरूस्‍ती, मौलझरी लघु प्रकल्‍पाची विशेष दुरूस्‍ती,  मूल येथील माजी मालगुजारी तलावाच्‍या कालडोह पुरक कालव्‍याची विशेष दुरूस्‍ती, जामखुर्द उपसा सिंचन योजनेची विशेष दुरूस्‍ती,  मूल   आणि पोंभुर्णा या तालुक्‍यातील शेतक-यांसाठी विशेष बाब या सदराखाली सिंचन विहीरी मंजूर, मूल   चिरोली, दाबगांव, गोलाभुज, राजोली, टेकाडी, डोंगरगांव आदी गावांमधील माजी मालगुजारी तलावाच्‍या विशेष दुरूस्‍तीची कामे आदी सिंचन विषयक कामे पूर्णत्‍वास आणली आहे.


चिखली आणि मोरवाही या गावात गेटेड साठवण बंधारे मंजूर झाल्‍यामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नातुन पुन्‍हा एकदा शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*