रोखठोक माझं मतं!भाग १.

 *निमित्त पर्यावरण दिनाचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे*


*रानवाऱ्यातून  निघाला पर्यावरण संरक्षणाचा एक नवा वारा*


*पर्यावरण संवर्धन व मानवता विकास मिशन ,संजिवन संस्था ,अ.भा.ग्राहक पंचायत सारख्या संस्था एका ध्येयाने प्रेरित होऊन पुढे आल्या*


दीपक देशपांडे.

५जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मूल नगरातील इकोपार्क येथे वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी वनविभागाच्या सौजन्याने संजिवन संस्थेने पुढाकार घेऊन एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा संघटक दीपक देशपांडे यांनी संजिवन संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरे यांचे सोबत संपर्क साधला आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली तशीच इच्छा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफेडो) तर्फे करण्यात आली आणि प्रत्यक्ष पर्यावरण दिनी या तिन्ही संस्था एकत्रित येऊन पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करीत वृक्षलागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे यासाठी प्रचार व प्रसार करणे यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याचा एक आगळावेगळा संकल्प करीत या इकोपार्कमधून वृक्षारोपण करून एक नवीन संदेश दिला.


आज सुरू असलेली अगणित वृक्षतोड, वन्यप्राण्यांचे मानवी  वस्तीवरील हल्ले व कुठलिही चूक नसताना गमवावा लागत असणारा जीव , विकासाच्या नावाखाली उपजाऊ जमीनीवर सिमेंट कांक्रिटचे जंगल , एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामागील कारण मिमांसा यांचा अभ्यास करता पुढे आलेले वास्तव आणि आपल्या पुढ्यात आणून ठेवलेले भिषण परिणाम बघता पर्यावरण संवर्धनाचे महत्व जाणून त्यासाठी आजच प्रयत्न केले नाहीतर किती गंभीर परिणाम भोगावे लागतील याचा विचार जनामनात रुजविणे अत्यावश्यक झाले आहे.


या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम म्हणजे एक दुग्धशर्करा योगच आणि जनतेच्या सहभागातून घडलेला कार्यक्रम एका यशस्वी वाटचालीत फार मोलाचे योगदान देणारा आहे.


वनविभागाच्या सौजन्याने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाची इतकी चर्चा यासाठी की शासकीय कार्यक्रम म्हणजे केवळ एका औपचारिकतेची पूर्तता एवढं संकुचित करुन ठेवलेल्या विचाराला इथे तिलांजली दिली आहे त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि पर्यावरण संवर्धन हा विषय अग्रक्रमाने त्यांच्याही अजेंड्यावर लोकांचे मत जाणून घेत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी उपयुक्त ठरविणार आहेत.यानिमित्ताने पुढे आलेल्या संघटना निश्चितच केवळ दिखाऊ पणासाठी व प्रसिद्धी साठी समोर समोर करणाऱ्या नाहीत हे आवर्जून सांगावें असे वाटते.


अशा कितीतरी शासकीय योजना आहेत ज्या शासकीय स्तरावर लोकसहभागाशिवाय अपूर्ण आहेत त्या योजनांच्या पूर्ततेसाठी अशाच सामाजिक संस्था च्या पुढाकाराने व मदतीने प्रयत्न केला गेला पाहिजे.

*एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ* हा मंत्र जपला गेला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*