कृषी महाविद्यालयाची विद्यार्थी चमू शेतकऱ्यांच्या बांधावर!

 कृषी महाविद्यालयाची विद्यार्थी चमू शेतकऱ्यांच्या बांधावर



दीपक देशपांडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल (सोमनाथ) येथे २०१८-२०१९ या शैक्षणिक  वर्षापासुन कृषि महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम तुकडी या वर्षी ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE)  च्या माध्यमातून संपर्क शेतकऱ्यांच्या शेतावर २० आठवडे, प्रत्यक्ष शेती तसेच शेती आधारीत ईतर उद्योग यासंबधी अभ्यास करणार आहे. 

या विद्यार्थ्या मार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारे विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान, सोयाबीन, कापुस, धान इतर तत्सम पिकांचे उन्नत वाण, कृषी अवजारे, इत्यादी बाबत माहिती शेतकरी बांधव यांचे पर्यंत पोहचविण्यात येईल. या विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषि कार्यानुभव सत्रा बाबत सविस्तर माहिती व्हावी याकरीता नुकतेच कृषि महाविद्यालय मूल (सोमनाथ) येथे तिन दिवसीय अभिमुख सत्र आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात कृषिविस्तार, किटकशास्त्र, कृषि अर्थशास्त्र, वनस्पती शास्त्र, कृषि अभियांत्रिकी या विषयतज्ञांनी विद्यार्थ्यांना या सत्रात पुर्ण करावयाचा अभ्यासक्रम, विविध प्रात्यक्षिके कश्या पद्धतीने आयोजित करण्यात यावी याबाबत अवगत केले. याप्रसंगी डॉ.  व्ही.  एस. टेकाडे, सहयोगी अधिष्ठाता यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना  विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, बिजप्रक्रिया, हिरवळीचे खत, सेंद्रिय शेती पध्दती याबाबत परिपूर्ण शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन केले.  या महाविद्यालयातील एकुण ४७ विद्यार्थीपैकी १८ मुली या कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तर २९ मुले कृषि संशोधन केंद्र, एकार्जुना (वरोरा) येथे ग्रामीण कृषि कार्यानुभवाचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.

 सदर अभ्यासक्रमात हे विद्यार्थी  निवड करण्यात आलेल्या  संपर्क गावात शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष  अनुभव ग्रहण करतील तसेच निवड करण्यात आलेल्या गावात बिजप्रक्रिया, माती प्रशिक्षण, जैविकशेती  पद्धती, खतांचा संतुलित  वापर, किड नियंत्रण, तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या ई-पीक पाहणी (माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा) इत्यादी विषयवार शेतकरी बांधव यांच्या करीता प्रशिक्षण आयोजित करतील. सदर सत्रा करीता डॉ. व्ही. एस. साखरकर, सहयोगी प्राध्यापक हे समन्वयक तसेच डॉ. एस. डि. सरनाईक व  डॉ. दिनेश नवलकर हे कार्यक्रम अधिकारी म्हणुन कार्य करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*