रोखठोक माझं मत भाग२

 नगरपरिषद,पं.स.,जि.प. सार्वत्रिक निवडणूका 

अनिश्चिततेत घोंघावणारे वादळ!

दीपक देशपांडे

केंद व राज्य या दोन सरकारांच्या वैचारिक मतभेद व राज्य सरकार आणि न्यायालय या विवादात जातीय आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तातडीने निवडणूक घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली आणि निवडणूक आयोगास निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागली.

निवडणूक आयोगाने जून्या नव्या याद्या एकत्र करीत मतदार याद्या प्रसिद्ध केल्या, त्याची पुढली पायरी म्हणजे उमेदवारांच्या राखिव गटाचे आरक्षण.. तो टप्पा पार पडला आणि आता त्यावर आक्षेप मागण्यात आले आहेत. विशिष्ट  मुदतीत ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण होईलच. अशीच प्रक्रिया पं.स. व जि.प.मध्येसुद्धा अनुभवता येणार आहे.

......पण खरी नाराजीची सुरुवात इथूनच तर होत आहे, कारण यावेळी महिलांना ५०टक्के आरक्षण आहे आणि आमच्या राजकीय मंडळींच्या मनात असलेल्या खऱ्या राजकारणाची सूत्रे कुठे महिलांच्या हातात जाऊन ही मातब्बर मंडळी सांगकामे नेतृत्व तर आपल्या हातात येणार नाही या संभ्रमात आहेत.

या बदललेल्या परिस्थितीत बऱ्याच दिवसांपासून वार्डात, प्रभागात आपली पकड मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न अचानक राखिव सिट किंवा प्रभाग फेररचनेत झालेल्या बदलामुळे बिनकामाचे झालेले आहेत , आणि नवीन वार्ड,प्रभाग शोधायला जावे तर तिथे विरोधात एक आधिपासून मजबूत पकड असलेला तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे.

अशा परिस्थितीत जनता व्यक्तीची निवड करणार की पक्षाचे उमेदवार निवडणार ? आणि छोट्या झालेल्या प्रभागात एकाएका मतासाठी प्रयत्न करावा लागणार ,ही एकच समस्या नाही तर मागील कार्यकाळात निवड झालेल्या उमेदवारांची कार्यपद्धती व जनतेप्रती दाखवलेली निष्ठा व पूर्ण केलेल्या कार्याची व दखलच न घेतल्या गेलेल्या  कामांचीही गोळाबेरीज यावेळी जनता जनार्दन म्हणजेच मतदार राजा केल्यावाचून राहाणार नाहीत. हीच बाब प्रतिष्ठान मांडून बसलेल्यांना चैनच पडू देत नाहीये.

दूसरा एक सूर असाही ऐकायला मिळतोय की निवडून येणारा उमेदवार जनतेच्या हितासाठी नाही तर तो स्वतःच्या हितासाठी अधिक प्रयत्न करत असतो त्यामुळे कोण किती खिसे रिकामे करणार आणि कुणाकडून किती मिळणार याचा मागोवा घेत फिरणारे ही काही कमी नसणार आहेत.

याशिवाय राजकीय पक्षांची प्रतिष्ठा,जुळणारी आणि तुटणारी युती किंवा आघाडी किंवा नवीन राजकीय उलथापालथ देखील या निवडणुकीत बघायला मिळणारच आहेत आणि तेच खरे निवडणूक निकाल बदलण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत.

एकंदरीत वेगवेगळ्या युक्त्या, वेगवेगळ्या समस्यांवर तोडगा काढत मतदारांची मर्जी सांभाळत ही निवडणूक राजकारणाला नवी दिशा देणार आहे ,चला तर मग तयारी करुया,कारण आपण लवकरच अनुभवणार आहोत निवडणुकांची रणधुमाळी.

लढा पण न्यायासाठी, सत्यासाठी , जनतेच्या भल्यासाठी पण कुणिही उठतोय आणि कुणाशीही भांडतोय,अशाने कुणाचं आणि कसं भलं होणार आहे?

समस्या संपणार नाहीत पण त्या वाढणार नाहीत यासाठी आपण सगळ्यांनीच संयुक्तपणे प्रयत्न केला पाहिजे.असं माझं स्पष्ट मत आहे.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*