मूलच्या जनतेचा श्वासच हिरावण्याचा प्रयत्न!

 *मालधक्का इथून हटलाच पाहिजे!*

जनतेला , प्रशासनाला अंधारात ठेवून असे काम कसे करु शकतात?


*जनतेचे भविष्य अंधाराच्या दिशेने ....!*

*मालधक्का हटवावाच लागेल अन्यथा.......*

.......अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारणार

दीपक देशपांडे मूल.

अंदाजे सुमारे दिडशे वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मूल रेल्वे स्टेशन परिसरातील माल धक्काचे काम थांबवुन आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी माल धक्काच स्थलांतरीत करण्याची मागणी मूल येथील मार्निग गृपच्या वतिने करण्यात आली असुन रेल्वे प्रशासनाने काम बंद करुन स्थलांतरीत न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा मार्निंग गृपच्या वतिने आयोजीत पत्रकार परिषदेत दिला आहे. 


मूल येथील पत्रकार संघाचे सभागृहात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत मार्निंग ग्रुपचे सदस्य जिवन कोंतमवार, अॅड. अश्वीन पॉलीकर, हिरेन गोगरी म्हणाले की, मूलच्या नागरीकांना फिरायला जाण्यासाठी कर्मविर महाविद्यालयाचे एकमेव पटांगण आहे, सदर पटांगणाला लागुन प्रादेशिक,वनविकास महामंडळ आणि बफर क्षेत्राचे मोठे जंगल असुन यापरिसरामधून वन्यप्राण्याची मोठया प्रमाणात    रेलचेल असते, असे असतानाही रेल्वे प्रशासनाने कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणाला लागुन असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या जागेवर माल धक्काचे काम जलद गतीने सुरु केलेले आहे, हे काम नगरपरिषदेत लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेवर नसताना प्रशासकीय राजवटीत सुरू आहे हे विशेष.

याही परिस्थितीत जनता जनार्दनाचे लक्ष ठरु नये यासाठी राजकीय मंडळी या पत्रपरिषदेत आवर्जून उपस्थित होती व जनतेला दिलासा मिळाला यासाठी या प्रकरणी विरोधात दंड थोपटून उभे राहाण्याची वक्तव्ये करुन गेलीतच आणि  सगळ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. कारण केंद्रात भाजपाचे सरकार आणि राज्यात आपल्याच अस्तित्वासाठी झगडत असणारे महाविकासाघाडीचे सरकार आहे.


सदर काम पुर्ण होवुन माल धक्का सुरु झाल्यास मूलच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, सदर माल धक्का सुरु झाल्यानंतर मानवी जिवनास अतिशय धोकादायाल असलेल्या कच्चा लोहामध्ये मिसळलेले कार्बन, मॅगनिज, फॉस्फरस, गंधक, सिलीकॉन आणि लोह यामुळे कार्बन मोनाक्साईड शुध्द वातावरणात मिळसुन श्वसन क्रिया होण्यास ऑक्सीजनची मात्रा कमी होईल आणि शरीरातील मस्तीक तंत्रिका उतक व हदय ठोके काम करणे बंद करू शकतो यामुळे मूल शहराला लागून असलेल्या माल धक्काचे ठिकाण स्थलातंरीत करणे गरजे असल्याचे त्यांनी सांगीतले.  

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने याबाबत रेल्वे प्रशासनाचे नागपूर येथील पबंधक मलिंद्र उप्पल यांना भेटुन मालधक्का   स्थलातंरणाबाबत चर्चा केली मात्र त्यांनीही पाहिजे तशी सकारात्मक चर्चा केली नाही,यामुळे भविष्यात   उद्भभवणाऱ्या आरोग्याच्या समस्या कायम दुर करण्यासाठी मूलच्या नागरीकांनी पुढाकार घेणे गरजचे असल्याचेही पत्रकार परिषदेत मार्निग गृपच्या सदस्यांनी आवाहन केले. 

यावेळी मार्निंग गृपचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

एकीकडे मालधक्का तयार करणाऱ्या कंत्राटदाराने या परिसरातील सागवान वृक्षाची अवैध कटाई करुन जमीन समतल केली , आरडाओरडा झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने या प्रकरणी कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करुन सागवान लाकूड जप्त करण्याची कार्यवाही केली तर रात्रीतून साफसफाई केलेल्या जागेवर माल जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू होती आणि आतातर या मालधक्का वर मालाची साठवण सुरू झाली आहे.

अत्यंत व्यावसायिक पद्धतीने रेल्वे विभाग व कंत्राटदार काम करीत असल्याने कुणाच्याही भावना विचारात घेण्यास रेल्वे मंत्रालय वा कंत्राटदार तयार नाही हे त्यांच्या कार्यप्रणालीतून दिसून येत आहे.

येत्या काही दिवसांत मूल हे केवळ डम्पिंग यार्ड होऊन जाईल आणि येथील जीवन संघर्षमय व आरोग्यास घातक होण्याची भिती व्यक्त होत आहे.

सुरक्षित पर्यावरणाचा ऱ्हास आणि जंगल संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या परिसरात वास्तव्य करणे तर सोडाच या परिसरातून बाहेर पडणे ही अशक्य होऊन जाऊ शकते. त्यामुळे जनतेनी स्वयंस्फूर्तीने या अघोषित लढाईत समाविष्ट होत येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी सुसज्ज असायला हवे आहे.


कोणता राजकीय पक्ष या विषयावर अधिक क्रियाशील होऊन जनतेच्या हितासाठी पुढे येऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल हे लवकरच कळेल परंतू तोपर्यंत वेळ निघून गेलेली नसावी अशीच भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत कारण ही समस्या फक्त मार्नींग गृप पुरती किंवा एका विशिष्ट पक्षापुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती गंभीर परिणाम भोगावे लागतील याचा इशारा देत आहे त्यामुळे सर्वपक्षांनी राजकीय मतभेद विसरून एकत्रितपणे लढा देण्याचीच आवश्यकता आहे हे विसरून चालणार नाही.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*