*बोलतात सगळेच पण सोबतीला कोण?

 *अजब नगराची गजब गाथा*

दीपक देशपांडे.

* व्यावसायिकांचे  रस्त्यावर अतिक्रमण अन् अतिक्रमण हटवावे तर दूसरा कुणीतरी जागा बळकावेल ही भिती.*

*बळीराजा चा वाली कोण?*

*गूजरी बंद.रस्तोरस्ती बाजार सुरू*


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात वर्षोनुवर्षे(तत्कालीन ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या)आता नगरवासियांच्या  सोयीने स्थानिक नगरपरिषद कार्यालयासमोर चौकात दररोजच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या असलेल्या   खाद्यान्न व भाजीपाला खरेदी करताना नगरवासीयांना  विशेष पायपीट करावी लागू नये म्हणून दूकाने थाटून व चौकातील रिकाम्या जागी भाजीबाजार भरविण्यास परवानगी दिली होती ती आजतागायत सुरू होती मात्र संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आणि त्याचा परिणाम या मूल नगरातही झाला.

सारे व्यवहार बंद करण्यात आले,तसेच भाजीबाजारही बंद करण्यात आले ,

काही दिवसांनी भाजीविक्री अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन भाजी विक्री सुरू झाली मात्र मूल नगरपरिषदेने आधी  नगरपरिषद परिसरातील पाण्याची टाकी तोडून काढण्याचे कारण देत भाजीबाजार भरविण्यास परवानगी नाकारली व ती प्रदिर्घ काळ चालली त्यानंतर काही काळ नगरपरिषद इमारत बांधकामाचे निमित्त पुढे करून  परवानगी नाकारली ,नंतर आम्ही सोडत काढून भाजीविक्रेते यांना जागा निश्चित करुन देऊ या सबबीखाली रस्त्यावर भाजीवाले यांना बसण्याची परवानगी दिली होती.

दिवसांमागून दिवस जात आहेत, आता तर काही भाजी विक्रेते यांनी काही मोक्याच्या जागी आपले चांगले बस्तान बसवले असून इतर भाजीपाला विक्रेत्यांना व शेतातील उत्पादित माल बाजारात विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रस्थापित भाजी विक्रेते यांना बेभाव माल विकावा लागतो किंवा यांच्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या रिकाम्या जागी बसून आपल्या मालाची विक्री करावी लागते,मग शेतातील ताजा माल खरेदी करताना नगरवासीयांना रस्त्यावर असलेल्या या शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करताना रस्त्यावर गर्दी करावी लागते ,व याची तक्रार येथीलच प्रस्थापित भाजी विक्रेते करतात व त्यामुळे शेतकरी त्यांचे लक्ष होतो.व निशाण्यावर येतो व शेतकऱ्यांना मातीमोल भावाने शेतमाल विक्री करावा लागला याचाच शेतकऱ्यांना  मोठा फटका बसला होता .

आजही खरी वास्तविकता लक्षात न घेता शेतकरी भाजीपाला घेऊन बाजारात आला की त्यांच्यामुळेच रस्त्यावर गर्दी होत असल्याचे कारण आमची पत्रकार मंडळी जेव्हा देतात तेव्हा मन सुन्न होऊन  खरंच शेतकऱ्यांचा कुणी वाली नसल्याचे लक्षात येते व म्हणून मग आपल्या त्या दुर्लक्षित बांधवांना न्याय मिळावा म्हणून खरी वास्तविकता तुमच्यापुढे ठेवण्यासाठी असा लेखनप्रपंच करावा लागतो.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊनही आज कित्येक दिवस झाले तरी नगरप्रशासनाने ना जागेची आखणी केली ना कोणता ड्रा काढला ना त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला की जेणेकरून गावभर रस्त्यावर भरणारा बाजार व त्यामुळे होणारी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावरुन कुठल्याही प्रकारची पहल केली व पुढाकार घेतला .

मात्र नगरातील रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर आमच्या माध्यमप्रतिनिधींनी या अपघाताचे खापर रस्त्यावर व्यावसायिक मंडळींनी केलेल्या अतिक्रमणामुळे होत असल्याचा दावा केला आणि नगरप्रशासनाने तेवढ्याच तत्परतेने  केवळ ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणा केली व आम्ही आमच्या परिने सूचना दिली म्हणून आपलीच पाठ थोपटून घेतली.

ना कोणत्याही लोकप्रतिनिधी ने यासाठी प्रशासनावर दबाव आणला ना कोणती उपाययोजना करण्याचा पाठपुरावा,मग काय आपोआप नगरप्रशासन एवढ्या सक्रियतेने कार्य करेल ही अपेक्षा करुनच कार्य संपन्न होईल असे वाटते?

आमचा शेतकरी, परतीच्या प्रवासात पावसाने झोडपले अन् शेतकऱ्यांना हातात आलेला घास हिसकावून घेतला तेव्हा  बळीराजा ला सल्ला देणारे राजकारणी, समाजसेवक सुद्धा पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाने ५०,०००₹ हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात धन्यता मानतात, यासाठी आगपाखड करतात, प्रसंगी पत्रकारांना शेतकऱ्यांची समस्या दिसत नाही काय?असा प्रश्नही उपस्थित करतात.पण स्वतः मात्र.....

आजवर शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/-₹ पर्यंत रक्कम अनुदान स्वरूपात परत करण्याची घोषणा केली होती व अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जात नाही याची वाच्यता ही कुणी करीत नाहीत, नाही शेतकऱ्याने काढलेल्या विम्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासनाच्या धोरणांचा निषेध केला जातो आहे  हीच तर या देशातील ,या राज्यांतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यातील कमतरता आहे,पण ही बाब कुणालाही आठवतच नाहीये ना?

नगरप्रशासनाने ठरवले तर  गावभर रस्त्यावर भरणारा बाजार  

एका दिवसात त्याच्या मुळ जागी परत येऊ शकतो व रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करता येऊ शकते, व्यापारी व्यावसायिक मंडळींनी दूकानांसमोर लावलेल्या वस्तू आत ठेवल्या जाऊ शकतात पण कुणाची इच्छाशक्ती ,कुणाची जनतेप्रती सदिच्छा आणि व्यावसायिक मंडळींना आपण जर हे अतिक्रमण कमी केले तर तिथे दूसराच कुणीतरी येऊन बसण्याची भिती यामुळे काहीच होत नाही ही वास्तविकता आहे.

आता जनतेला सावधानता व विरोधात लढा देण्याची गरज येऊन पडली आहे.

बोला आहे तुमची तयारी ? शासन प्रशासनाला जाब विचारण्याची? त्यासाठी समस्त समाजमाध्यम तुमच्या पाठीशी उभे राहतील अशी या माध्यमप्रतिनिधींच्या वतीने मी ग्वाही देतो.पण उगाच कुठलेही कारण देऊन आपली छाप पाडण्याच्या प्रयत्नात माध्यमप्रतिनिधींवर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला जाऊ नये.ही आग्रही भूमिका व विनंती.

आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*