लक्ष्मीपूजन! दिवाळीचा असाही एक महत्वाचा दिवस.

 लक्ष्मीपूजन

अश्विन अमावस्येला ।

होत असे लक्ष्मी पूजन ।।

व्हावी बरकत धन धान्याची ।

म्हणून होते कुबेराचेही पूजन ||


घर असो किंवा कार्यालय….दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.या प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेर पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होते. अश्विन कृष्ण अमावास्येच्या मुहूर्तावर घरात कुटुंबातील सर्वांच्या उपस्थितीत ही पूजा करावी. यावेळी घरातील लक्ष्मी म्हणजेच धनाची विशेषत्त्वाने पूजा केली जाते. यावेळी देवाला आणि धनाला धने, गूळ,लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो.


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी अभ्यंगस्नान करून देवपूजा, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी (संध्याकाळी)  सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजनाचा विधी आहे. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे.   


राधिका देशपांडे.


 आमचे चाहते ,वाचक , बातमीदार , जाहिरातदार, विरोधक आणि समस्त जनतेला तेवढ्याच आत्मियतेने  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*