*सहज सुचलं म्हणून...*

 *सहज सुचलं म्हणून...*




देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या देशातील सामान्य माणूस लढला...


त्यावेळी देशातील राजे महाराजे हे इंग्रज सरकारचे सत्तेतले भागिदार होते....


कॉंग्रेसचे नेते खा.राहूल गांधी यांनी नागपूरच्या कॉंग्रेस रॅलीत बोलताना केला आरोप....


बातमी...


भागिदारी होती तर मग बहादुर शहा जफर यांना परदेशी कैदेत का ठेवले होते राहुलजी...?


झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना तटावरून घोडा का फेकावा लागला..?


तात्या टोपे यांना फासावर का चढवले गेले....?


भोसलेंची राजधानी नागपूर काबीज करण्यासाठी इंग्रजांना बाकाबाई भोसलेंना फितूर का करवावे लागले...?


या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत कां आपल्या जवळ राहूल गांधी...?


यापुढे आपली भाषणे तयार करणा-यांना इतिहासाचा चांगला अभ्यास करायला सांगा राहुलजी...


म्हणजे जनतेसमोर आपला पचका होणार नाही....


कारण आपण वाचला नसेलही...


पण या देशातील बहुसंख्य जनता देशाचा इतिहास अभ्यासते राहुलजी..


जय विदर्भ...


अविनाश पाठक.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*