*ग्राहक* आणि *ग्राहकाला न्याय मिळवून देणारी पावती हा महत्त्वाचा पुरावा.* *दीपक देशपांडे.*

 *ग्राहक* आणि *ग्राहकाला न्याय मिळवून देणारी पावती हा महत्त्वाचा पुरावा.* *दीपक देशपांडे.* भाग १.


ग्राहक म्हणजे काय?:-अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर १.ग्रहण करणारा तो ग्राहक.

 मात्र कायद्याच्या चौकटीत सांगायचे झाले तर..२.पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा, किंवा मिळवणारा  तो ग्राहक.

ग्राहकाची त्रिसूत्री:-

१) ग्राहक हा राजा आहे.

२.ग्राहक हा आस आहे.

३.ग्राहक हे भांडवल आहे.

त्यामुळे संपूर्ण अर्थकारणाचा गाडा हा ग्राहकांवर अवलंबून आहे , अशास्थितीत ग्राहक जागृत नसल्याने आणि तो विखुरलेला असल्याने त्यांची पदोपदी फसवणूक होत आहे. त्यांच्या अज्ञानामुळे , वेळोवेळी दाखविल्या जाणाऱ्या आमिषांमुळे तो त्या आमिषांना बळी पडून समोरच्यावर,विश्वास ठेवून शोषणाचा बळी ठरत आहे. त्याने फक्त ग्राहक ,ग्राहकांचे हक्क , ग्राहक संरक्षण कायदा हे शब्द दूरुनच ऐकले आहेत मात्र त्यात नेमकं काय आहे आणि हा कायदा ग्राहकांच्या मागे किती मजबूती ने पाठराखण करण्यासाठी किती विचारपूर्वक तयार केला आहे याबाबत अजूनही अज्ञानी आहे आणि म्हणूनच तो फसवला जात आहे त्याची ग्राहक म्हणून फसवणूक होत आहे. या शोषणापासून मुक्त होण्यासाठी  ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही नोंदणीकृत अशासकीय संस्था NGO ग्राहकांना जागृत करण्यासाठी या कायद्याचा जन्मदिवस २४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक जागृती पंधरवाड्यानिमित्त विद्यार्थी ग्राहक जागृती अभियान राबवित आहे. 

या अभियानात विद्यार्थी हा आधार मानून त्यांचे प्रबोधन करीत एक जागृत पिढी तयार करण्याचा संकल्प करीत एका नव्या पर्वाची सुरुवात आम्ही करीत आहोत, यानिमित्ताने ग्राहक म्हणजे काय त्याची भुमिका काय असावी ,त्याने वस्तू वा सेवा विकत घेताना चोखंदळपणे नेमक्या कोणत्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे , त्यामुळे नेमकं काय होऊ शकते ,आणि ग्राहकाची फसवणूक होण्यापासून तो कसा सुरक्षीत राहू शकतो आणि तरीही त्यांची फसवणूक झालीच तर तो कशाप्रकारे त्याविरोधात दाद मागण्यासाठी पात्र ठरेल आणि यशस्वीपणे तक्रार दाखल करु शकेल ह्याबाबत सखोल अभ्यासपूर्ण माहिती कशी द्यावी , याबाबत मार्गदर्शन करताना नेमक्या शब्दात ती मांडण्याची कला शिकायची आणि शिकवायची मानसिकता तयार करणे हाच आमचा मुख्य उद्देश असला पाहिजे .असे मत ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल यांनी व्यक्त केले.


आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे असे सगळे मानत असले तरीही आम्ही आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे असे मानतो,कारण आज त्याच्या मनावर जे संस्कार केले जातील त्याच संस्कारात तो वाढेल आणि मग त्याच संस्कारांची शिदोरी घेऊन तो पुढील आयुष्याची वाटचाल करणार आहे याचं काळात जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले आणि तो चोखंदळपणे व्यवहार करायला शिकला तर पुढे जाऊन कुणीही त्याची फसवणूक करुच शकणार नाही आणि जरी झालीच तर तो निमुटपणे ते सहन न करता त्याविरोधात आवाज उठवत तक्रार करुन न्याय मागण्यासाठी तयार असेल.योग्यरितीने तक्रार करुन न्याय ही मिळवून घेईल याची खात्री आहे.आम्हाला ती पिढी घडवायची आहे.


पावती हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे आणि कोणतीही वस्तू वा सेवा विकत घेताना पावती मागण्याची सवय आपल्याला फसवणुकीपासून निश्चितपणे वाचवू शकते त्यामुळे आजच्या दिवसाचा पहिला संकल्प असावा तो म्हणजे मी कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेताना पावती मागीतल्याशिवाय आणि पावती घेतल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात आपल्या  स्वतःपासून करा आणि अनुभव घ्या ,एकदा नाही अनेकदा त्यासाठी नकार मिळेलही तरीही कुणाशी वाद न घालता सातत्याने संवाद साधत रहा एक दिवस तुम्ही निश्चित पणे यशस्वी झालेले असालच यांची खात्री बाळगा.तोच तुमचा विजयदिन असेल त्या दिवसाची प्रतीक्षा करीत सातत्य टिकवून ठेवा , यश हे आपल्यासमोर असणार आहे आणि हीच आजच्या दिवशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करीत लांबणाऱ्या शब्दांना विराम देतो. आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दीपक देशपांडे यांनी असे मत मांडले .

या ग्राहक दिनी २४ डिसेंबर रोजी ,विविध क्षेत्रातील निवडक कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. 

© दीपक देशपांडे.

पुढील  भागात.....

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*