आज श्रद्धेय अटलजींचा जन्मदिवस


         
युग पुरुषाला वंदन*
       *आज अटलजींचा जन्मदिन*
       
    
     *बाधाएं आती हैं आएं*
     *घिरें प्रलय की घोर घटाएं,*
     *पावों के नीचे अंगारे,*
     *सिर पर बरसें यदि ज्वालाएं,*
     *निज हाथों में हंसते-हंसते,*
     *आग लगाकर जलना होगा.*
     *कदम मिलाकर चलना होगा.*
     *.... अटल बिहारी वाजपेयी*
  
        *ग्वाल्हेर.. भारतभूमिला परमवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च करणाऱ्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्व भारतरत्न अटलजींचे जन्म स्थळ. (२५ डिसेंबर १९२४)*
        *देशातील कोणीही सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष.. जगातील जनसामान्य.. प्रत्येकाच्या मनांत अटलजींचे नाव ऐकताच आदरभाव जागृत होतो. त्यांचे जीवन चरित्र हे सदैव प्रेरणादायीच आहे. राजकारण हे शेवटच्या घटकाच्या सुखासाठीच हवे हे त्यांनी सिद्ध केले. तत्वाशी जन्मभर एकनिष्ठ राहणे म्हणजे काय.. अजातशत्रूत्व म्हणजे काय याचे ते मुर्तिमंत उदाहरण. हिंदूधर्माचा विशाल सहिष्णू परीघ त्यांनी जगाला पटवून दिला. राजकारण हे देशहितासाठी हवे सत्तेसाठी नाही याचा परिपाठ देशात घालून दिला होता.*
        *अटलजींची ओळख ही कवीमनाचे.. कोमल हृदयी म्हणून होती. पण आचरणात गीता तत्वज्ञान होते. मग जेव्हा वेळ आली तेव्हा देशहितास्तव जगाच्या आर्थिक बहिष्काराची तमा न बाळगता अणुस्फोटासारखा कठोर निर्णय पुन्हा घेतला. एक बलाढ्य अणुसंपन्न राष्ट्र म्हणून पुनश्च भारताची ओळख निर्माण केली.*
        *भारत हा शांतताप्रिय देश. शेजारच्या राष्ट्राशी सलोखा राहावा म्हणून अजातशत्रू अटलजींची प्रामाणिक भूमिका. प्रसंगी  शत्रूराष्ट्राशीही मैत्रीचा हात पूढे केला.. त्यांना सुधारण्याची संधी दिली.*
        *देशाच्या समग्र विकासावर त्यांनी चिंतन केले. देशाचा विकास हवा तर चांगले रस्ते हवेत हे लक्षात घेत देशाच्या ग्रामीण भागापासून देशाच्या चारही टोकाच्या महानगरांना जोडणारे रस्ते बांधण्याचा प्रारंभ अटलजींनी केला. अटलजी जन्मभर अत्यंत साधे जीवन जगले. शुन्यातून पक्ष उभारणी केली. देशभराच्या भ्रमंतीत त्यांनी लाखो लोकांशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले.*  
        *एक संवेदनशील लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख होती. अटलजी वक्ता दशसहस्रेशु होते. त्यांची अमोघ.. ओजस्वी वाणी ऐकण्यासाठी समस्त देश आतूर असायचा. प्रत्येक सभेला देशभर लाखोची गर्दी व्हायची. जेव्हा त्यांनी पत्रकारीता केली त्यामध्येही पत्रकारीतेचा आदर्श निर्माण केला. राजकीय भाषण कसे असावे याचा तर ते आदर्शच.*
        *अटलजींना पदाचा मोह नव्हता. पण पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडत पक्षनिष्ठेचा सन्मान कसा करावा हे पण शिकवले. लोकशाहीत राजकीय पक्षांनी कसे वागावे याचा आदर्श त्यांच्या नेतृत्वाने राजकीय पक्षांसमोर ठेवला.*
        *अटलजी हे सत्तेत असो वा नसो त्यांच्याविषयी जगभर सर्वांनाच आदर होता.. आजही आहे. राजकीय विरोधकही आदर करीत अटलजींच्या प्रामाणिक नेतृत्वाचा गौरव करायचे. अटलजी म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे उत्तुंग व्यक्तीमत्व. अटलजींचे जीवन म्हणजे ज्ञान.. विज्ञान.. अध्यात्म.. श्रद्धांचा संगमच. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण हा देशहितासाठीच खर्च केला.*
        *अटलजींनी देशाच्या  अणुसंपन्नतेनंतरही अहंकार न बाळगता विश्व शांतीसाठी प्रयत्न केले. युनोत राष्ट्रभाषेचा सन्मान वाढविला.* 
        *अटलजी विरोधी पक्षाचे नेतृत्व करत होते तेव्हा भारताने पाकवर विजय मिळवत बांगला देशाची निर्मिती केली. मोठ्या मनाने त्यांनी पंतप्रधान इंदिराजींचा संसदेत "दुर्गा" म्हणून गौरव केला. राजकीय पक्षात मतभेद असू शकतात.. असणारच, कारण शेवटच्या व्यक्तीचा विकास कसा करावा यावर मतांतरे असणारच. पण जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा सर्वच राजकीय पक्ष सरकारच्या बाजूने ठामपणे उभे राहतात.. हा संदेश अटलजींनी जगाला दिला.*
        *राजकारणात जयपराजय होणारच. पण लोकशाहीत पराभवही कसा स्विकारावा हे पण अटलजींनी शिकवले. मात्र जीवनात ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात कधी हार मानू नये याचाही मंत्र अटलजी दिला. जो राजा असतो तो योगी असतो. योगींना स्वतःचे असे जीवन काहीच नसते. हाच पंतप्रधान पदाचा आदर्श अटलजीनी निर्माण केला. त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठीच.*
        *भारताला प्रगतीची अटल निश्चयी वाट दाखविणाऱ्या अटलजींना त्यांच्या जन्मदिनी त्रिवार वंदन..

  *_गीत नया गाता हूं ।_*

  *_टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर_*
  *_पत्थर की छाती मे_*
  *_उग आया नव अंकुर_*
  *_झरे सब पीले पात_*
  *_कोयल की कुहुक रात_*
  *_प्राची मे अरुणिम की रेख_*
  *_देख पाता हूं_*
  *_गीत नया गाता हूं_*

  *_टूटे हुए सपनों की_*
  *_कौन सुने सिसकी_*
  *_अन्तर की चीर व्यथा_*
  *_पलकों पर ठिठकी_*
  *_हार नहीं मानूंगा,_*
  *_रार नहीं ठानूंगा,_*
  *_काल के कपाल पे_*
  *_लिखता मिटाता हूं_*
  *_गीत नया गाता हूं_*

🌹⚜🌸🔆🇮🇳🔆🌸⚜🌹

  *गीत : अटल बिहारी वाजपेयी*       ✍

  

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*