मूल तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ,वृध्दापकाळ योजनेची १०४ प्रकरणे मंजूर

 

मूल तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ,वृध्दापकाळ योजनेची १०४ 

मूल –  दीपक देशपांडे.



गरिबांचे कल्याण व निराधारांना आधार मिळावा या हेतूने शासनातर्फे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना अनेक वर्षापासून सुरू करण्यात आली असून 



संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ योजना ,वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी एका विशेष सभेचे
आयोजन दिनांक २६  डिसेंबर २०२३ रोजी दूपारी १.०० वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्याअध्यक्षा  सौ.वंदना अगरकाटे,  यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, मूल येथे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर सभेमध्ये समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी उपस्थित राहून खालील प्रमाणे  प्रकरणे मंजुर   केलीत.

संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण ३१,  

इंदिरा गांधी विधवा योजना पात्र प्रकरण १३

 श्रावणबाळ योजना पात्र प्रकरण ५९

नामंजूर प्रकरण ०५

वृध्दापकाळ योजना पात्र प्रकरण ०१

अशी एकुण सादर १०९ प्रकरणापैकी १०४ प्रकरणे निकाली काढण्यात आले असुन नामंजुर प्रकरणाची संख्या एकुण ०५आहे. त्यातील त्रुटी पूर्ण करुन ती प्रकरणे पुढील सभेत मंजूरीसाठी ठेवता येतील असे ठरविले गेले.

निराधारांना आधार देण्यासाठी दिनांक २७ डिसेंबर २३ रोजी झालेल्या बैठकीत नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, पंचायत समिती अधिकारी , समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजनेतील कर्मवारी वृंद  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*