*आँनलाईन सेवा केंद्रातील अनागोंदी कारभाराविषयी तहसीलदार मृदूला मोरे यांना निवेदन,ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेचा पुढाकार.*

 *आँनलाईन सेवा केंद्रातील अनागोंदी कारभाराविषयी तहसीलदार मृदूला मोरे यांना निवेदन*

ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेचा पुढाकार.

*मूल, दीपक देशपांडे*


मूल तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रचालक शासकीय योजनांसह वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांकडून शासनाने निर्देशीत केलेल्या दरपत्रकानुसार  शुल्क आकारणी न करता मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करुन ग्राहकांची फसवणूक व लुट करीत असल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या मूल तालुका शाखा मूल कडे मागील कित्येक दिवसांपासून येत आहेत.

त्या तक्रारीची दखल घेत ग्राहक पंचायत पदाधिकारी यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या आपले सरकार आँनलाईन सेवा सुविधा केंद्राला  तसेच विविध ग्रामपंचायतीच्या सुविधा केंद्राला भेट देऊन ग्राहकांना येणाऱ्या अनुभवांची नोंद घेतली आणि खात्री पटल्यानंतर  तहसीलदार मूल यांना अशोक मैदमवार ,उपाध्यक्ष मूल तालुका शाखा मूल  यांच्या नेतृत्वाखाली एक  निवेदन सादर केले.

त्यात

विषय:-१.आपले सरकार सेवा केंद्रात ग्राहकांची लुट थांबविण्यासाठी सेवा शुल्क दरफलक लावणे बंधनकारक करणेबाबत.

२.ग्रामपंचायत स्तरावरील आँनलाईन सेवा केंद्राचे संचालन सुरळीत नसल्याने ग्राहकांना मूलला येरझारा घालाव्या लागत असल्याबाबत तक्रार  दाखल करीत खालील बाबी नमूद केल्या.

ग्राहक पंचायत मूल कडे आलेल्या असंख्य तक्रारींचा सखोल अभ्यास करता असे निदर्शनास आले आहे की,

१.मूल शहरात आपले सरकार आँनलाईन सेवा केंद्राचा सुळसुळाट झाला असून क्वचितच एखाददुसऱ्या सेवा केंद्रात दरफलक दर्शनी भागात लावलेला आहे तर बहुतेक सेवाकेंद्रात असे दरफलकच नाहीत.

२.दरफलकच नसल्याने ग्राहकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी केली जाते.

३.ग्राहकांना आपले काम झाले पाहिजे असा विचार असतो त्यामुळे कुणी फारशी हुज्जत घालत नाहीत मागेल ती रक्कम देऊन देतात.

४.शासनाने ग्रामपंचायत स्तरावर आँनलाईन सेवा सुविधा केंद्र स्थापन केले असून तेथे संगणक चालकांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे ,मात्र हे संगणक चालक त्या  ग्रामपंचायतीच्या सेवाकेंद्रात बहुतेक नसतातच त्यामुळे ग्रामस्थांना वेळेवर आवश्यक त्या कागदपत्रांची गरजभासल्यास वा शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास मूल शहराकडे धाव घ्यावी लागते.

५.ग्रामपंचायतीचे हे संगणक चालक मूल शहरात स्वतः:चे आँनलाईन सेवा केंद्र थाटून त्या माध्यमातून व्यवसाय करीत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. ह्याबाबत योग्य ती कारवाई केली जावी,ही ग्रामस्थांची मागणी असून ती योग्य असल्याचे ग्राहक पंचायत च्या चमूचे निदर्शनास आले आहे.

६.सेवा केंद्रावर सेवा संपली असून तो केवळ व्यवसाय झाला आहे .

परिणामी ग्राहकांना

१ गावातील  सेवा केंद्रात योग्य  सेवा मिळावी.

२.ग्राहक सेवा केंद्रात फसवणूक टाळण्यासाठी व शोषण थांबविण्यासाठी दरफलक लावणे बंधनकारक करण्यात यावे.

 आपण तालुक्याच्या  दंडाधिकारी म्हणून याबाबत या केंद्र चालकांना सुचित करुन  ग्राहकांची फसवणूक व शोषण थांबविण्यासाठी सहकार्य करावे  अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलचे वतीने करण्यात आली आहे.

हे निवेदन देऊन ग्राहक पंचायत मूलच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मृदूला मोरे यांचेशी चर्चा केली असता तहसीलदार मॅडम यांनी तातडीने सर्व आपले सेवा केंद्र चालक आणि ग्रामपंचायत संगणक चालकांची  दिनांक ३/०५/२०२४ रोजी सभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

ग्राहकांच्या सोयीसाठी उभारलेल्या आपले सेवा केंद्रात ग्राहकांची फसवणूक व शोषण होऊ नये यासाठी ग्राहक पंचायत मूल शाखेची ही एक महत्त्वाची पहल असून  शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ग्राहक पंचायत  महाराष्ट्र मूलचे शिष्टमंडळात दीपक देशपांडे, अशोक मैदमवार,रमेश डांगरे, तुळशीराम बांगरे, परशुराम शेंडे, मुक्तेश्वर खोब्रागडे, राहूल आगडे,बादल करपे , एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*