महिला दिन थाटात साजरा

 *महिलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा*

*उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे आवाहन*


*चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन*

चंद्रपूर  m2Mन्यूजब्यूरो 

  आजच्या महिला तसेच मुलींमधील वैचारिक शक्ती दिवसेंदिवस प्रगल्भ होतांना दिसत आहे. याचा फार मोठा प्रभाव हा समाजघटकांकडून व मुख्यत्वे शिक्षण तसेच घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते शक्य झाले आहे. परंतू पुर्वीच्या काळात मात्र स्त्रीयांना बंधनाचे जोखड पार करुन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना विविध गोष्टींची आवड असतांनाही पुरुषी मक्तेदारीमुळे त्याला बाजूला ठेवावी लागत असे. केवळ ‘चुल आणि मुल’ हेच तिचे विश्व बनले होते. आजही तशी परिस्थिती काही भागात सुरुच आहे. त्यामुळे महिलांची प्रगती खुंटत गेली, तिला तिचे अस्तित्वच तयार करता आले नाही. यापासून तिला सुटका हवी असल्यास मी कोण आहे  ? याचा प्रथम तिने विचार करावा व त्या अनुषंगाने प्रयत्न करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभागृहात ८ मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी देवईकर, प्रमुख वक्त्या उप पोलिस अधिक्षक(गृह) राधिका फडके व चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेच्या उपाध्यक्षा राधिका देशपांडे यांची उपस्थिती होती.

आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी महिन्यातून एक दिवस आपल्यासाठी जगण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी पाच सुत्र महत्वाची भूमिका बजावित असून त्याद्वारे आपण आपल्याला मानसिक समाधान देवू शकतो. आज स्त्रिया कितीही उच्चपदस्थ असल्या, कुठेही कर्तूत्व गाजवत असल्या तरी घरी गेल्यावर तिला आपल्या कुटूंबासाठीच आयुष्य खर्ची घालावे लागते. त्यामुळे काम करुन आल्यावर जो मानसिक व शारिरीक आधार मिळायला पाहिजे तो मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने घरची कामे वाटून घेतल्यास तिलाही आपल्यासाठी थोडा वेळ काढता येऊ शकतो. यासाठी महिन्यातून एक दिवस ठरवून त्या दिवशी आपल्या आवडीचा पदार्थ बनवावा, आपल्या आवडत्या रंगाची वस्तू खरेदी करावी, आपला आवडता छंद जो असेल तो जोपासा, आपल्या अतिशय जिवलग मैत्रीणीशी फोन करुन गप्पा माराव्या तसेच आपली तब्बेत ठणठणीत राहावी यासाठी योगा, मॉर्निंग वॉक नित्यनेमाने करा अश्या सुचना वरखेडकर यांनी उपस्थित महिलांना केल्या. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतून महिलांना सकारात्मक दृष्टीकोण बाळगण्याचे आवाहन केले.

बिजिंग मध्ये १९७२-७३ या वर्षी जागतिक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना आपले कार्यकर्तृत्व कोणते राहिल, आपल्या जबाबदार्‍या कोणत्या, व काळानुरुप आपल्यामध्ये कोणकोणते बदल करणे आवश्यक आहे तसेच सकारात्मक वैचारिक दृष्टीकोण बाळगण्यासाठी शिक्षणासोबत आपल्याला आणखी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे. याविषयी विचारविनिमय होऊन रुपरेषा आखण्यात आली. आपल्या देशात पूर्वीच्या काळी महिलांनी एका मर्यादेत राहण्यासाठी तिच्यावर नानाविध बंधणे घालण्यात आली. त्यामुळे महिलांना त्याप्रमाणात आपला विकासच साधता आला नाही. परंतू जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे व अश्या अनेक महिलांनी सामाजिक जोखडातून बाहेर पडून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केली. त्यांच्याच प्रेरणेने आज महिलांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा नंदिनी देवईकर यांनी केले. 

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात राधिका देशपांडे यांनी ब्राह्मण सभेने आतापर्यंत केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा उहापोह केला तसेच येणार्‍या वर्षात सभेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन पुर्वा निखिल पुराणिक यांनी तर आभार प्रतिभा ठेंगडी यांनी मानले. स्तवन स्वरश्री जोधी या चिमूकलीने तर स्वागतगीत अपर्णा घरोटे यांनी गायले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सभेच्या सदस्या रोहिणी पुराणकर, अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल पुराणकर, उपाध्यक्ष सुरेश धानोरकर, सचिव सचिन सांबरे,कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, सदस्य चंद्रकांत अगरकाठे, विनोद ठेंगडी, मंगेश भोंबे तसेच समस्त ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


*महिलांनी ‘सायबर क्राईम’ बाबत सजग असावे- उपपोलिस अधिक्षक राधिका फडके*

पुर्वीच्या काळात संयुक्त कुटूंबपध्दती आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी त्याचा योग्य प्रकारे आणि पटकन निपटारा व्हायचा. एकंदरीतच घरातील वृध्द महिला व पुरषांना एक प्रकारे सुरक्षित वातावरण मिळायचे. परंतू आता कुटूंब लहान होत असून शहरात अनेक ठिकाणी मुल, मुली लग्नानंतर एकतर विदेशात असतात किंवा मग आपल्या आईवडीलांपासून लांब राहतात. त्यामुळे घरात एकटे राहणार्‍या वृध्द महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच सायबर क्राईममध्ये वाढ झाली असून अश्या एकट्या महिलांना हेरुन भामटे आर्थिक लुबाडणूक करतात. तसेच त्यांची हत्या करुन चोरी करतात. त्यांना मोबाईलचे संपूर्ण ज्ञान नसल्यानेच असे प्रकार घडतात. यासाठी त्यांनी पुण्यात घडलेल्या एका उच्च्भ्रु घरातील उदाहरण देवून यात अधिक स्पष्टता आणली. एका नायजेरियन इसमाने घरात एकट्या राहणार्‍या एका महिलेला हेरुन तिच्यासोबत फेसबुकद्वारे ओळख निर्माण केली. तिच्यासोबत लग्न करतो अश्या खोट्या आनाभाका केल्या. त्याच्या या भुलथाप्याला बळी पडत महिलेने आपल्याकडे होते नव्हते तेवढी सर्व रक्कम त्याला दिली. त्यासाठी तिने आपले दोन प्लॅट्सही विकले. ही बाब तिच्या शेजारीच राहणार्‍या तिच्या मुला मुलीला तिने सांगितली नाही. परंतू शेवटी आपण फसलो गेले हे कळताच तिने आपल्या कुटूंबाला आपबिती सांगितली. अश्या अनेक महिलांना अश्याप्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अश्या महिलांनी सायबर क्राईम बाबत सजग राहावे असे आवाहन उपपोलिस अधिक्षक (गृह) राधिका फडके यांनी केले.

पाच रणरागिणींचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्य विशेष कार्य करणार्‍या पाच रणरागिणींचा यावेळी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये चैताली

पुल्लीवार-खटी, डॉ.अपर्णा देवईकर, रागिणी वेलंकीवार, वृषाली भोंबे व वेदश्री भट यांचा समावेश होता.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*