खास झाडीपट्टीत झाडीबोली साहित्य संमेलनाचा ढोल वाजणार*

 *खास झाडीपट्टीत झाडीबोली साहित्य संमेलनाचा ढोल वाजणार*


मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे २९ वे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन ‌


*दीपक देशपांडे,मूल*

२९वे झाडी बोली साहित्य संमेलन यावेळी मूल तालुक्यातील जूनासुर्ला येथे आयोजित करण्यात आले असून प्राचिन इतिहास लाभलेल्या या गावात आपल्या बोलीभाषेचा जागर करण्यासाठी आणि आपली बोलीभाषा टिकवून त्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे असा उद्देश ठेवून ह्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल येथिल विश्राम गृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत केले आहे.

कार्यक्रम पत्रिका समोर ठेवताना या संमेलनात अनेक साहित्यिक आपली उपस्थिती दर्शविणार असून बोलीभाषा टिकवून ठेवण्यासाठी अशा संमेलनाचे आयोजन किती महत्वाचे आहे याचा प्रत्यक्ष आलेख पुढे ठेवला.

या संमेलनाच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिका सुद्धा खास बोलीभाषेत तयार करण्यात आली असून कार्यक्रम स्थळी चंद्रपूर जिल्हा व मूल परिसरातील मान्यवर साहित्यिक यांचे नांवे सभामंडपाच्या नावे देऊन एकप्रकारे त्यांचा सन्मान केला गेला आहे.

या निमंत्रण पत्रिकेत आवतन दिले असून यांतील बरेच शब्द आपल्याला जून्या काळातील बोलीभाषेचा प्रत्यय करुन दिल्याशिवाय राहत नाही, म्हणून आम्ही खास आपल्या रसिक, वाचकांसाठी ते आवतनही सोबत देत आहोत.


झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्या वतीने साहित्य मंडळ शाखा जुनासुर्लाच्या वतीने २९ वे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलन दि. १२ व १३ मार्च २०२२ रोजी स्व.मा. सा. कन्नमवार साहित्य नगरी (इंदिरा गांधी हायस्कूल) येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

 संमेलनाध्यक्ष म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक व साहित्यिक डॉ. मनोहर नरांजे हे राहणार आहेत तर या संमेलनात मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती असणार आहे.

 साहित्यसंमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते, संमेलनाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर तथा पुर्वाध्यक्ष डॉ. संजय निंबेकर यांचे उपस्थितीत होणार आहे. 

विशेष अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी  कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, ज्येष्ठ साहित्यिक हिरामण लांजे, कवी ना. गो. थुटे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डोमा महाराज , डॉ.परशुराम खुणे, अंजनाबाई खुणे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. 

प्रमख अतिथी म्हणून तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी राजकीय मंडळी यांची उपस्थिती असणार आहे. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. परशुराम खुणे व ज्येष्ठ साहित्यिक. लखनसिंह कटरे यांची प्रगट मुलाखत उद्धव नारनवरे  घेणार आहेत.


समारोपिय कार्यक्रम दि.१३ मार्च रोजी माजी अर्थमंत्री  आ. सुधीर मुनगंटीवार, जिप. अध्यक्षा संध्या गुरनूले, पंस, सभापती चंदू मारगोनवार, जिप. सदस्या शितल बांबोळे, मूलच्या माजी नगराध्यक्षा  रत्नमाला भोयर, माजी पं.स. उपसभापती अमोल चुदरी, डॉ. बळवंत भोयर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.

झाडीपट्टीतील, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चारही जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, उपाध्यक्ष डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, सचिव राम महाजन, जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर, विजय मेश्राम गोंदिया, डॉ. चंद्रकांत लेनगुरे गडचिरोली, प्रा. नरेश आंबिलकर भंडारा, शाखाध्यक्ष, धनराज खानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष रंजित समर्थ,  गणेश झगडकर, विजय मेश्राम गोंदिया, डॉ. चंद्रकांत लेनगुरे गडचिरोली, प्रा. नरेश आंबिलकर भंडारा,  धनराज खानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष रंजित समर्थ, कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे, सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम व झाडीबोली साहित्य सर्व आश्रयदाते जुनासुर्ला गावचे सर्व ग्रामस्थ यांनी केले आहे.

याप्रसंगी अनेक मान्यवरांचे सत्कार , गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, संमेलनाचे संयोजक कुंजीराम गोंधळे तसेच झाडीपट्टीतील अनेक युवकांचा व कलावंतांचा सत्कार केला जाईल. .

 या संमेलनात, पहिल्या दिवशी प्रामुख्याने विविध स्पर्धा, पथसंचलन, उद्घाटन, पुस्तक पुरस्कार वाटप व प्रकाशन, बातचीत,प्रगट मुलाखत,बायकांचे गाणे, लोकजागृतीचे कार्यक्रम,तुमची आमची मंडई अंतर्गत झाडीपट्टीची दंडार, तर दुसऱ्या दिवशी झाडी कवी संमेलन, बातचीत,चला या ना गावा गाना, आणि प्राथमिक सिक्सनात बोलीचा महत्व,आणि संमेलनाचा समारोप अशाप्रकारे आयोजन करण्यात आले आहे.


या पत्रपरिषदेला या संमेलनाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे व रंजित समर्थ, स्वागताध्यक्ष उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*