महिला दिन व सायबर सुरक्षा सप्ताह

 *महिला दिन व सायबर सुरक्षा सप्ताह*

दीपक देशपांडे.



आज ८मार्च , जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व सुरू असलेल्या सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त महिलांना मार्गदर्शन व सायबर गुन्ह्यांच्या संख्येत होणारी वाढ व त्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन करीत आपल्या छोट्या चुकांमुळे मोबाईल हरविण्याचा प्रकार , त्यामुळे होणारे नुकसान व आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे होणारी फसवणूक व त्यापासून सावधानतेच्या सुचना या प्रसंगी ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांनी उपस्थितांना दिल्या.


मूल पोलिसांनी , उपनिरीक्षक प्रशांत ठावरे यांचे मार्गदर्शन व सायबर सेलच्या मदतीने नागरिकांचे हरविलेले २८+१=२९ मोबाईल वेगवेगळ्या परिसरातून यशस्वीपणे शोधून काढले आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने आणि सायबर सुरक्षा सप्ताह साजरा करीत असतांनाच त्या नागरिकांना त्यांचे २०२०-२१मध्ये हरविलेले मोबाईल परत करीत चेहऱ्यावर हास्य फुलविले.

याप्रसंगी मूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, ब्रम्हपुरी चे पोलिस निरीक्षक यादव साहेब, मूल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत ठावरे , पत्रकार दीपक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती  होती.


आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे महिलांना मोबाईल फोन परत देताना त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला बहुसंख्य मोबाईल धारक व इतर मंडळी,आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*