भारताचा ७५वा स्वातंत्र्य दिन आणि आनंदवनाचा हरीत संकल्प

 *आनंदवनातील भन्नाट वृक्षारोपण*

*दीपक देशपांडे*



आज भारताच्या ७५व्या स्वातंत्र्या दिनाच्या निमित्याने खूप चांगला कार्यक्रम आनंदवन येथे साजरा करण्यात आला.

साधारणपणे तीन वर्षा पूर्वी आनंदवन ने वृक्षारोपण करायचा ठाम निर्णय घेतला , त्यावेळी श्री.सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते व ते या कार्यक्रमाला हजर होते आणि या वृक्षारोपणा ला ' 'अटल घन वन ' हे नाव सरकारी परिपत्रक काढून देताना आनंदवन ला त्याचे श्रेय देण्यात आले. 


तेव्हा पासून आज पर्यंत जवळ जवळ ४३,००० हजार झाडे लावण्यात आलीत व त्यातील फक्त २% झाडे जगली नाहीत. पण बाकीच्या ९८% वृक्षारोपणा मुळे एक छान जंगल तयार झाले आहे. 


आज आनंदवन येथे जे वृक्षारोपण झाले व त्यात ७५ रोपं लावण्यात आले ती रोपे आनंदवनातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या कडून लावण्यात आले. एवढेच नव्हे तर लागवड करणाऱ्या त्या त्या कार्यकर्त्यांचे नाव पण त्या त्या रोपांना देण्यात आले.  अगदी नावाच्या पाटी सहित .


आता आधी लावलेल्या वृक्षारोपणाला  दोन वर्ष होऊन जे काही जंगल निर्माण झाले आहे त्यात नीलगाय, हरणे , मोर , ससे, कोल्हे आणि रानडुक्कर यांचे दर्शन होऊ लागले आहे.एवढेच नाही तर मागच्या वर्षी एक बिबट्या पण दर्शन देवून गेला आहे. आणि त्यामुळे आनंदवन येथे या वृक्षरोपणा मुळे पूर्व दिशेला झाडांची एक हिरवीगार भिंत  (ग्रीन वॉल )तयार झाली आहे.

आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अशी ग्रीन वॉल आपला संपूर्ण सोमनाथ प्रोजेक्ट जो ३५ चौरस की.मी. १३५० एकर ताडोबाच्या बफर झोन मधे समविष्ट झाला आहे तिथे ही अशीच ग्रीन वॉल संकल्पना येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले आहे .

यामुळे मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात एक नैसर्गिक हिरवीगार भिंत काही वर्षांत पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही,हे विशेष.

आनंदवन प्रकल्प व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या इतर सर्वच प्रकल्प नैसर्गिक संपत्ती चे केवळ जतनच करते असे नव्हे तर नैसर्गिक सौंदर्य जोपासण्यासाठी अग्रेसर आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*