*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...१९*

 *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...१९*

*प्रचार तोफा थंडावल्या*

*दीपक देशपांडे*

१३चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी बुधवारी सायंकाळी ६वाजता संपली असून सार्वत्रिक  निवडणूक २०२४ च्या पहिल्या  टप्प्यातील सर्व प्रकारच्या प्रचारतोफा थंडावल्या असून आरोप प्रत्यारोप थांबले आहेत , आणि म्हणूनच जनतेने एकप्रकारे सुटकेचा निःश्वासही सोडला आहे.

खरेतर  खऱ्या प्रचाराची सुरुवात याच क्षणापासून सुरु होत असते कारण गटागटाने आणि  जाहीर सभांचे आयोजन थांबले असून वैयक्तिक प्रचार आणि जनतेच्या दारात हात जोडत आपण काय करणार किंवा आपल्या पक्षाला काय करायचं आहे ,आपला उमेदवार काय करणार हे सांगत मतदानाचा आग्रह करीत उमेदवार आणि समर्थक मतदारराजाच्या दारात हात जोडताना दिसणार या दोनच दिवसांचा तो राजा असतो हा भाग वेगळा.

मतदारराजाला ही गोष्ट चांगलीच ठाऊक असते तरीही तो आपल्या राजा असण्याची ताकद  आजमावण्यासाठी  या दारात आलेल्या आणि जनसेवा बनू बघणाऱ्या उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून काय मिळेल याची प्रतीक्षा करीत असतात आणि आपल्या मतांची विक्री शे-पाचशे रुपयांना करण्यासाठी तयार असतात ,आणि आपले हक्क गहाण ठेवून आयुष्यभराची लाचारी पत्करतात, उद्या जाऊनत्या लोकप्रतिनिधीने दिलेला शब्द पाळला नाही तर त्याला कोणताही जाबजबाब विचारण्याचा हक्कच गमावलेला असतो.

शासन प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करीतच असते , अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत असते ,एकाने दिले म्हणून दुसराही द्यायचा प्रयत्न करतो आणि या चढाओढीत वादविवाद  होतात, मारहाण होते , सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न केले जातात ,यातूनच ...वेगळे संघर्ष निर्माण होतात ,ज्यांचा दूरान्वयानेही संबंध नसतो असे कार्यकर्ते भरडल्या जातात.

त्यामुळे... मतदार राजा जागा हो, आपल्या अधिकारांप्रती जागरुक हो आणि आपल्या  एका  मतांची किंमत ओळख आणि कोणत्याही भुलथापांना बळी न पडता,काही पैशाच्या बदल्यात आपल्या अमूल्य अशा मतांची कवडीमोल किंमत लावून स्वहित बघणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची घोडचूक न करता  सक्षम व जनहित जपत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सक्षम अशाच उमेदवारांची निवड केली पाहिजे. हे सत्य मान्यच करावे लागेल.

तेव्हा ,बा मतदारराजा! तुझ्या अधिकार आणि कर्तव्ये पूर्तीसाठी तू तुझा मतदानाचा हक्क बजावायला विसरु नकोस ,पण म्हणून कुणाच्याही कोणत्याही आमिषालाधमकीला बळी  पडून मला काय त्याचे म्हणत बसण्यापेक्षा उठ , घराबाहेर पड आणि आपल्या अमूल्य अशा मतांची ताकद ओळख व मतदानाचा हक्क बजाव. हा मतदानाचा हक्क बजाव , मतदान केंद्राजवळ तयार करण्यात आलेल्या सेल्फीपाईंटवर बोटाला लागलेली शाई दाखवत सेल्फी काढ व निवडणूक आयोगाला फोटो पाठव व बक्षिसांच्या स्पर्धेत सहभागी हो , यासाठीच तर निवडणूक आयोगाने अशी स्पर्धा जाहीर केली आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*