सदानंद बोरकर सर्वोत्कृठ नाट्य लेखक, म्हणून सन्मानित!

 सदानंद बोरकर सर्वोत्कृठ नाट्य लेखक, म्हणून सन्मानित!

दीपक देशपांडे .

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नागपूरचा यंदाचा सर्वोत्कृठ नाट्य लेखनाचा पुरस्कार *सदानंद बोरकर* यांना जाहीर झाला होता, नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या समारंभात सदर पुरस्कार सदानंद  बोरकर  यांना  सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते डॉ. विलास उजवणे, नाट्यपरिषदेचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, नाट्य  परिषदेचे  नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील , सचिव नरेश गडेकर, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, राकेश खाडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.   

*माझं कुंकू मीच पुसलं, आत्महत्या, नवरे झाले बावरे, हा खेळ सावल्यांचा, कारस्थान, अस्सा नवरा नको गं बाई, बदनाम रस्त्याचा संघर्ष : गंगाजमुना आणि  दोन घराचं गाव* अश्या समाजिक नाटकांचे सदानंद बोरकर यांनी लिखान केले असून ह्या नाटकांचे हजारो प्रयोग रंगभूमीवर झालेले आहेत. आत्महत्या नाटकाची *सार्क इंटरनॅशनल थिएटर* महोत्सवासाठी निवड झाली असून भारताकडून ह्या नाटकाचे सादरीकरण झाले आहे.  माझं कुंकू मीच पुसलं आणि आत्महत्या ही दोन नाटके गोंडवाना विद्यापीठात एम. ए. मराठी ला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ठ झाली आहेत. कलावंत म्हणून त्यांना शेकडो पुरस्कार असली तरी लेखक म्हणून त्यांना मिळालेला हा प्रतिष्ठेचा पहिलाच पुरस्कार असल्याचे त्यांनी Ddbatmiportalm2m प्रतिनिधी सोबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*