डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी १४तास वाचन संस्कार.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी १४तास वाचन संस्कार.

दीपक देशपांडे मूल 


आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मूल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनातून १४ तास वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा संदेश दिला. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गृहपाल प्रशांत फरकाडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे. विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथ वाचून आपले ज्ञान वाढवावे व त्यातून आपला व समाजाचा विकास साधावा अशाप्रकारचे मार्गदर्शन गृहपाल प्रशांत फरकाडे यांनी केले. तसेच संदीप पारचे यांनी बाबासाहेबांवर एक गीत सादर केले तर खोजराज गेडाम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी घनश्याम निखाडे, राहुल गेडाम, शुभम गावतुरे तसेच वसतिगृहातील विद्यार्थी उपस्तिथ होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त १४ तास वाचन उपक्रमात खोजराज गेडाम, गुरुदेव आसोले, प्रियाद मुंडरे, सतीश जुमनाके, योगेश कन्नाके, प्रज्वल गेडाम, युवराज कोवे, साहिल वेलादी व कुंदन किन्नाके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मूल येथील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*