*निवडणूक समरांगणातील लढवय्ये..१७* सामाजिक पाठिंबा???

 *निवडणूक समरांगणातील लढवय्ये..१७*

*सामाजिक पाठिंबा???*

*आयोजन मेळाव्याचे प्रयोजन पाठिंब्याचे आणि हाती आले क्षण विरोधाचे*

*दीपक देशपांडे*

*प्रसंग होता बाका, पाठिंबा जाहीर करण्याचा*

*निमंत्रण मात्र दिले  होते सत्कार सोहळ्याचे*

*काॅंग्रेस उमेदवाराची उपस्थिती रोष घेऊन आली,*

*पाठिंब्याऐवजी दूषणे आणि फूट देऊन गेली.*


अनेक वर्ष सत्तेवर असतानाही विकास कामे न करणाऱ्यांना मतदारांनी आता धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातीन अनेक गावांमध्ये असे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळा व सामाजिक मेळावा तेली समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काँग्रेसला पाठिंबा देण्यात येत असल्याची घोषणा होताच उपस्थित समाजबांधवांनी त्याला चांगलाच विरोध केला. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे दिसताच लोकांचा पारा आणखी चढला. प्रतिभा  धानोरकर सुधीर मुनगंटीवार यांच्या  नखाचीही बरोबरी करू शकत  नाही. असा आरोपही केला गेला .

चंद्रपूर-वणी-आर्णी  लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता विकास कामांच्या  मुद्द्यावर येऊन पोहोचली आहे. केलेली कामे दाखवा मग  बोला, असे आता मतदार बोलू लागले आहेत. अशात  भाजपचे आमदार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार  प्रतिभा धानोरकर यांना विकास कामे दाखवण्याचे आव्हान  दिले आहे. दिवंगत खासदार बाळू घानोरकर यांनी केलेली  विकास कामे केल्याचा दावा काँग्रेसकडून केला गेला आहे.

तेली समाजाच्यावतीने मातोश्री सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळा व सामाजिक मेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मात्र हा कार्यक्रम 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला. आपल्या काही समर्थकांच्या माध्यमातून काँग्रेसने कार्यक्रमस्थळी आमदार धानोरकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करून घेतल्याचा आरोप करीत तेली समाजातील अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला.  तेली युवक मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ तथा तेली समाजाच्या इतर संघटनांच्यावतीने तुकुमच्या मातोश्री सभागृहात हा सत्कार व सामाजिक मेळावा सुरू होता. उल्लेखनिय कामगिरीसाठी सुभाष रघाताटे, अँड.केतन खनके व कवडू लोहकरे यांच्या सत्काराचे औचित्य साधत काँग्रेस सेवादल संघटनेचे जिल्हाच्यक्ष सूर्यकांत खनके यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. तेली समाजाच्या सर्व बंधू भगिनींना केवळ सत्कार सोहळा असल्याचे सांगत निमंत्रण देवून एकत्रित आणण्यात आले. याच कार्यक्रमाला प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांना निमंत्रित केले गेले.  सत्काराचा कार्यक्रम सुरळीत सुरू होता. अशातच काँग्रेसच्या काही समर्थकांनी धानोरकर यांना पाठिंबा जाहीर केला. सेवादलचे खनके यांनी तेली समाजाच्यावतीने तशी घोषणा केली. त्यामुळे वाद आणखीनच भडकला. यावेळी तेली समाजाच्या काही मंडळींनी खनके यांना घेराव करून धक्काबुक्की पर्यंत  मजल गेली. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजाला बोलावून अशा प्रकारे पाठिंबा जाहीर करणे योग्य नाही, समाजात राजकारण आणू नका अशीही भावना व्यक्त केली. 

*सोशल मीडिया वर निषेध*

तेली समाजातील अनेकांनी या घटनेचा समाज माध्यमावर निषेध व्यक्त केला आहे. केवळ सत्कार व समाज मेळाव्याचे निमंत्रण देत ऐनवेळी प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न केविलवाणा असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहे.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. अशात काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यासाठी व ओबीसी प्रवर्गातील तेली समाजासाठी कोणते योगदान दिले असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. पाठिंबा द्यायचाच होता तर काँग्रेसने धाडस करीत ही बाब थेट जाहीर करायची असती. सत्कार आणि सामाजिक मेळाव्याचे निमंत्रण द्यायचे आणि ऐनवेळी पाठिंबा घोषित करायचा, ही बाब चुकीची असल्याचा संतापही आता व्यक्त होत आहे.

त्यामुळे कांग्रेस समर्थक  आयोजकांची *करु गेले काय अन् उलटे झाले पाय* अशी  स्थिती झाली असून समाजात व मतदारांत एक वेगळाच संदेश गेला असून काॅंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.


तर दुसरीकडे कुणबी समाजाचे पूर्ण समर्थन असल्याचा दावा करणाऱ्या काॅंग्रेसच्या  गोटातील कुणबी समाजाचे वतीने तसेच नानाविध  समाज संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला जात आहे त्यामुळे ही निवडणूक केवळ जातीपातीच्या भरवशावर लढली जाणार नसून विकास आणि कार्यक्षम व्यक्तीला संसदेत पाठविण्याची तयारी मतदार करीत असल्याचे चित्र  दिसत  आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*