आपला संकल्प:-विकसित भारत यात्रेचे मूल शहरात स्वागत.

 आपला संकल्प विकसित भारत :-संकल्प यात्रेचे मूलमध्ये अभूतपूर्व स्वागत! जनतेचा सहभाग.

दीपक देशपांडे 

देशात गरिबांना सुरक्षा आणि प्रतिष्ठा प्रथमच लाभली आहे,
ज्यांना देशाच्या विकासावर ओझे असल्याचे अनेक दशके
भासविले जात होते,तेच आज देशाचा विकास गतिमान करीत आहेत.
:-नरेंद्र मोदी. या घोषवाक्यासह निघालेल्या या विकसित भारत यात्रेचे मूलमध्ये स्वागत.


"विकसित भारत या संकल्प यात्रेने  देश जोडला जात असून जनतेला शासकीय योजना थेट गावखेड्यांत अतिशय जलदगतीने माहिती उपलब्ध करुन देण्यात यशस्वी ठरत आहे. या यात्रेमुळे शासकीय यंत्रणाही कार्यक्षम झाली आहे असे मत या यात्रेचे संयोजक दिनेश अडगळ  आमचे सोबत वार्तालाप करताना व्यक्त करतात.."

केंन्द्र सरकारच्या लोककल्याणकारी विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे  माध्यमातून देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. मूल शहरातील गुजरी चौकात नगरपरीषद मूल येथे गुरूवार  दिंनाक २५ जानेवारी २०२४ ला सकाळी ९.३० वाजता संकल्प यात्रेेचे आगमन झाले. यावेळी शहारातील नागरिकांना रथातून चित्रफीतीव्दारे संकल्प यात्रेचा उदेश तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

संकल्प यात्रेचे स्वागत नगरपरीषद मूल कार्यालयाच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार यानी केले. यावेळी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी  नगरसेवक मोती टहलियानी, माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत मनियार,दीपक देशपांडे,तथा प्रमोद मशाखेत्री उपस्थित होते.

संकल्प यात्रेचे प्रमुख दिनेश अडगळ व महावितरण विभागाचे अभियंता चंदन चौरसिया,या कार्यक्रमाला उपस्थित होते,तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संध्या किनाके प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन, सिकलसेल विभाग, राष्ट्रीय कुष्ठरोग विभाग, सेतू विभाग, आधार कार्ड, महावितरण इ.विविध विभागांचे माहिती स्टॉल्स लावण्यात आले होते.

या प्रसंगी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना,घरकुल योजना, विश्वकर्मा योजना, आयुष्यमान भारत योजना,दीनदयाळ अंत्योदय योजना ,पंतप्रधान आवास योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना,आधार केवायसी.,महावितरण,कृषी योजना, आदी विविध लोक कल्याणकारी योजनाविषयी माहिती देवून जनतेला सजग करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना देय अनुदान राशीच्या धनादेशाचे प्रासंगिक वाटपही करण्यात आले. त्यानंतर आपल्या मनोगतातून लाभार्थ्यांनी आलेले अनुभव व शासकीय योजनांचा लाभ यावर आपले अनुभव कथन ही केले व मोदी सरकारचे व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी आयोजकांंतर्फे विकसित भारतासाठी , आणि  मतदार दिनानिमित्त उपस्थित जनतेला शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,मात्र या कार्यक्रमाचे आयोजनाचा उद्देश आणि महत्व पटवून देताना नागरिकांनी अशा कार्यक्रमांतून योजनांची खरी माहिती मिळवून घेण्याची गरज मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी उजागर केली , आणि अशाच महत्वपूर्ण कार्यक्रमांना नागरिक पाठ दाखवतात अशी खंतही व्यक्त केली आणि नंतर आम्हाला माहितीच सांगितली जात नाही असा टोलाही लगावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश अडगळ यांनी , प्रास्ताविक विनोद येनूरकर,तर आभारप्रदर्शन श्रीकांत समर्थ यांनी केले. या कार्यक्रमाला नगरवासी जनता , विविध योजनांचे लाभार्थी,नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक**✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*