पटवारी' चम्पत राय🙏, 🍳आरसा...@विनोद देशमुख

 पटवारी' चम्पत राय🙏

🍳आरसा...@विनोद देशमुख

' भाग १ वरून पुढे)

चम्पत राय यांनी स्वत: गोळा केलेल्या हजारो कागदपत्रांमधील शब्दनशब्द वाचला आहे. तसंच अयोध्येशी संबंधित एकूणएक पुस्तक चाळलं आणि खटल्यात फायदेशीर ठरतील असे निवडक दस्तैवजी पुरावे एकत्र करून वकिलांच्या स्वाधीन केले. रामजन्मभूमीच्या न्यायालयीन लढाईत चम्पत राय यांनी केवढी महत्त्वाची कामगिरी बजावली, याची यावरून कल्पना यावी. या 'अभ्यासा'मुळे त्यांना रामजन्मभूमीचं संपूर्ण प्रकरण अथपासून इतिपर्यंत, बारीकसारीक तपशिलासह तोंडपाठच झालं आहे🧐 त्यामुळे त्यांना "अयोध्येचा विश्वकोश" असंही म्हटलं जातं.

या कामाची प्रेरणा त्यांना रा. स्व. संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्रो. राजेन्द्रसिंग उपाख्य रज्जूभय्या यांनी दिली. 1975 च्या आणिबाणीत दीड वर्ष तुरुंगवास भोगणारे संघ स्वयंसेवक चम्पत राय तेव्हापासूनच रज्जूभय्यांच्या नजरेत होते. त्यांनी आंदोलन काळात, बाबरी मशीद पडण्याच्या आधीच, राय यांना कागदं गोळा करण्याच्या कामाला वाहून घेण्याचा सल्ला दिला आणि सूचनाही केल्या. या कामासाठी चम्पत राय यांनी प्राध्यापकाच्या नोकरीवरच लाथ मारली👍

त्यांची आणिबाणीतील अटकही नाट्यपूर्ण होती. बिजनौर जिल्ह्याच्या धामपूर येथील आर. एस. एम. डिग्री कॉलेजमध्ये ते नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवत होते. तेवढ्यात अटक वॉरंट घेऊन पोलिस वर्गात घुसले. (ही इंदिरा गांधींची लोकशाही🤔) विद्यार्थी विरोध करतील, हे लक्षात घेऊन राय यांनी पोलिसांना समजावलं आणि स्वत: पोलिस ठाण्यात येण्याचं वचन देऊन संभाव्य अपप्रसंग टाळला. वर्ग संपल्यानंतर ते सरळ घरी गेले, आईवडिलांच्या पाया पडले आणि थेट ठाण्यात हजर. पुढचे दीड वर्ष तुरुंगात राहण्यासाठी🥺

बाबरी मशिदीचा कलंक अचानक भुईसपाट झाला नाही. त्याची योजना आणि तयारी करण्यात आली होती. 6 डिसेंबर 1992 यादिवशी घटनास्थळी हजारो कारसेवकांच्या गर्दीत, युवकांच्या गराड्यात उभ्या असलेल्या चम्पत राय यांना एका पत्रकारानं विचारलं- "अब क्या होगा ?" यावर त्यांनी सहज उत्तर दिलं- "ये रामजीकी वानरसेना है। सीटीकी आवाजपर पीटी करने यहां नही आयी है। जो करने आयी है, वह करकेही जाएगी !" असं म्हणत, एक फावडं हातात घेऊन, चम्पत राय पुढे सरकले. तेवढ्यात "जय श्रीराम" च्या घोषणा झाल्या. कोणीतरी इशाऱ्यासाठी शंख वाजविला अन् कारसेवकांचा लोंढा बाबरी मशिदीच्या एका घुमटावर चाल करून गेला. (या लोंढ्यात शिवसैनिक होते ?) चम्पत राय येथे सेनापतीच्या भूमिकेत होते✊

असं, झोकून देऊन काम करणारे हिरे ज्या कार्यात वर्षानुवर्ष लागले होते, ते काम हमखास यशस्वी होणारच आणि त्यांचा रामलला स्वगृही परतणारच. पाच शतकांचा अन्याय सोमवारी मिटला तो त्यामुळेच.‌ निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नि:स्वार्थ, अथक परिश्रमानंच रामललाच्या पुनरागमनाचा 'पासपोर्ट' तयार होण्याचा मार्ग मोकळा केला, हे मान्य करावंच लागेल🤣 यात पुढे असलेले 78 वर्षांचे 'योद्धा' चम्पत राय यांना दंडवतच🙏 जय श्रीराम🙏🙏

++++++++++


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*