नमकहराम इतिहासकार🤔

 नमकहराम इतिहासकार🤔

🍳आरसा...@विनोद देशमुख

संपन्न वारसा आणि इतिहास असलेल्या भारताचं दुर्दैव हे आहे की, आपल्याकडील काही इतिहासकार मातीशी बेईमानी करणारे देशद्रोही निघाले🥺 त्यांनी चुकीचा इतिहास भारतीयांच्या माथी मारला, याची शेकडो उदाहरणं सांगता येतील. ब्रिटिश राजवटीत हे काम राज्यकर्त्यांनी हेतुपूर्वक घडवून आणलं. कारण, त्यांना भारतीय समाजात फूट पाडून राज्य चालवायचं होतं. परंतु, स्वतंत्र भारतातही तेच सुरू राहिलं, हे आपलं दुर्दैव.

 धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अशा लोकांना प्रोत्साहन दिलं गेलं, ज्यांनी हिंदूंचा इतिहास, परंपरा, धर्म यांना कमी लेखण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला. विशेषत: डाव्या विचारसरणीच्या तथाकथित पुरोगामी (कु)विचारवंतांनी, इतिहासकारांनी, पत्रकारांनी प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाची जेवढी मोडतोड करता येईल तेवढी केली आणि चुकीची, विकृत, परकीयांचे उदात्तीकरण जास्त करणारी माहिती प्रसारित केली. त्यामुळेच अकबर  'ग्रेट' ठरवला गेला, पण त्याच्या कितीतरी पट महान असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं महत्त्व देशाला नीट समजूच दिलं गेलं नाही. 

अयोध्येची रामजन्मभूमी हे याचं ज्वलंत उदाहरण होय. रामजन्मभूमी प्रकरणात प्रारंभापासूनच विरोधी भूमिका घेणाऱ्यांमध्ये इरफान हबीब, रोमिला थापर यांच्यासारखे इतिहासकार हिंदूविरोधी विधाने सातत्यानं करीत राहिले आणि त्याद्वारे राममंदिर विरोधकांना 'मसाला' पुरवत राहिले.

यातीलच प्रो. इरफान हबीब आता, वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत हिंदू देवतांचे शिल्प सापडल्यानंतर, काय म्हणतात पाहा- "हां, ये दावा एक तरह से सही है। मगर, क्या मुल्क में यही चलता रहेगा कि कहां मस्जिद तोडकर मंदिर बनाए गए और कहां मंदिर तोडकर मस्जिद। या प्रतिक्रियेचा मतलब काय ? आक्रमकांनी जशी मंदिरं पाडून तेथे मशिदी बांधल्या, तशीच हिंदूंनी मशिदी पाडून मंदिरं उभारली, असंच त्यांना सुचवायचं आहे ना.

 हबीब हे मध्ययुगीन आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी असं विधान कसं काय केलं ? मशीद पाडून मंदिर बांधल्याचं एक उदाहरण दाखवा. उलट, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर नव्या मशिदी बांधून दिल्याचं तुमचेच पुरोगामी लोक सांगत असतात (छत्रपतींना धर्मनिरपेक्ष ठरवण्यासाठी). आणि, मुख्य म्हणजे, हिंदूंना मशिदी पाडून मंदिरं बांधण्याची गरजच नव्हती. कारण, हिंदूंची बहुतांश मंदिरं इस्लामच्या जन्माच्या कितीतरी शे-हजार वर्षांच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मग, कशाच्या आधारावर हबीब मशिदी पाडण्याच्या गोष्टी करतात ?

हाच तो बुद्धिभेद🤔 हिंदू समाजात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न. अशा इतिहासकारांना नेहरू-इंदिरा काळात खतपाणी घातलं गेलं. येथेच भारताच्या इतिहासाचा घात झाला; नव्हे मुडदाच पडला आणि "खोटं बोल, पण रेटून बोल" अशी सवय या इतिहासकारांना जडली. त्याचेच दुष्परिणाम आपण आजही भोगत आहोत.

 हबीबसारखे मुस्लिम इतिहासकार खोटारडे असल्याची फक्त हिंदूंचीच भावना नाही. तर, संवेदनशील मुस्लिम मान्यवरही त्यांच्यावर इस्लामी जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करतात. 

भारतीय पुरातत्त्व खात्याचे तेव्हाचे (१९७८) महासंचालक डॉ. लाल यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या परिसरातील सर्वेक्षणात-उत्खननात विद्यार्थी म्हणून  सहभागी झालेले पुरातत्त्व खात्याचे निवृत्त संचालक (उत्तर भारत) डॉ. के. के. मोहम्मद यांनीच या पक्षपाती इतिहासकारांची पोल खोलली आहे. 

ते म्हणाले- "बाबरी ढाच्याखाली आढळलेल्या मंदिराच्या अवशेषांचा बोलबाला झाल्यानंतर मुस्लिम समाजातील अनेक सुज्ञ लोक यासाठी तयार होते की, बाबरी मशीद हिंदूंना सोपवून ही समस्या सामंजस्याने मिटवून टाकावी. परंतु, प्रो. हबीब यांच्या नेतृत्वाखालील इतिहासकार संघटनेच्या सदस्यांनी मुस्लिम जनमानसाची दिशाभूल करून हा तोडगा हाणून पाडला.

 राम-रामायण काल्पनिक आहे, पूर्वी तेथे राममंदिर असल्याची अधिकृत नोंद नाही, मंदिराचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे मुस्लिमांनी बाबरी मशिदीवरील दावा सोडू नये, अयोध्या मुळात बौद्धांची, जैनांची आहे वगैरे अपप्रचार त्यांनी जोरात चालविला. एवढेच नव्हे, तर बाबरी मशीद कृती समितीच्या बैठकांमध्येही हे लोक सतत भाग घ्यायचे. (अव्यापारेषु व्यापार.) याच्या परिणामी प्रकरण चिघळलं आणि पुढे नको ते घडलं."

डॉ. के. के. मोहम्मद यांच्या परखड विधानांनी हे स्पष्टच होतं की, मुस्लिमांपेक्षा डाव्या इतिहासकारांनाच बाबरीची चिंता जास्त होती आणि सत्य सांगण्याचा आपला 'धर्म' विसरून ते सर्रास खोटं बोलत होते. अन् आता तेच इरफान हबीब, ज्ञानवापीतही मंदिरावशेष सापडल्यामुळे सावध झाले आहेत अन् म्हणताहेत- "हो, आक्रमकांनी बांधलेल्या काही मशिदी या मंदिर पाडून उभारल्याचे दावे खरे आहेत. पण हे असं किती काळ चालू ठेवणार ?" अरे वा, तुम्ही आमची मंदिरं पाडून मशिदी बनवाल अन् आता आम्ही चुकीची दुरुस्ती (पूर्ववत्) करू इच्छितो तर त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न कराल. चांगले धंदे आहेत तुमचे.

 जरा स्पेनमध्ये जाऊन पाहा. मुस्लिम आक्रमकांनी चर्चेस पाडून बांधलेल्या मशिदी ख्रिश्चन राज्यकर्त्यांनी पुन्हा चर्चमध्ये रूपांतरित करून टाकल्या. (हूं का चू नाही.) भारतात तर फक्त अयोध्या, काशी, मथुरा या तीनचीच, तीही रीतसर, मागणी आहे. (डॉ. के. के. मोहम्मद तर इतरही अनेक वास्तूंबद्दल सांगत असतात.) यात तडजोड होऊ देण्याऐवजी खुटीउपाडपणा करून लोकांना भडकवणाऱ्या हबीबसारख्या खोट्या इतिहासकारांना भारतविरोधक, देशद्रोही, नमकहराम याशिवाय दुसरं काय म्हणायचं, सांगा😣

++++++++++


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*