मूल शहरातील गणतंत्र दिवस ध्वजारोहण सोहळा

 मूल शहरातील गणतंत्र दिवस ध्वजारोहण सोहळा 

दीपक देशपांडे 

२६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय गणतंत्र दिनाचा ७४वा वर्धापनदिन सोहळा निमित्ताने मूल शहरातील ऐतिहासिक जून्या बाजार चौकात  प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी नगरातील गणमान्य मंडळी, महिला ,माजी व भावी नगरसेवक ,शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी ,एनसिसी कॅडेट्स, होमगार्ड, शहरातील विविध शाळा महाविद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थी , विविध व्यावसायीक व नागरीक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.



या मुख्य सोहळ्यानंतर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या तीन गटातून नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते , या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहभागी होत उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले आणि या कार्यक्रमानंतर लगेच बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला आणि विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली,या कार्यक्रमाचा नगरवासियांनी मनसोक्त आनंद लुटला, आणि आयोजकांचे , तहसील प्रशासनाचे अभिनंदन करीत अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची मनीषा व्यक्त केली आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*