उर्जा महोत्सवाचा समारोप!


.....आणि .......

उर्जा महोत्सवाचा समारोप!

मूल नगरीत पहिल्यांदाच आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख अतिथी म्हणून हाजर, सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनूले ,

दीपक देशपांडे ,मूल


दिनांक ३०जूलै२०२२रोजी  महावितरण, विद्युत मंत्रालय भारत सरकार, सौर ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, वीज वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य, यांचे उज्वल भारत, उज्वल भविष्य या कार्यक्रमा अंतर्गत विद्यूत पारेषण कंपनी चंद्रपूर चे वतीने मूल येथे ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

२०१४–१५ ते २०२२–२३ या आठ वर्षाच्या कार्यकाळात ऊर्जा मंत्रालय यांच्या वतीने विविध योजनांचे वतीने शेतकऱ्यांना, व लहान मोठे उद्योग, यांना लाभ मिळाला पाहिजे,तसेच आर.डी. एस.योजने अंतर्गत पुढील योजना आखण्यात येईल, याकरिता सतत वीज वितरण कंपनी कार्य करीतअसते, उन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता रात्री दिवसा, वेळी अवेळी आमचे अधिकारी , लाईनमन २४ तास वीज ग्राहकाची सेवा करीत असल्याचे मत संध्या चिवंडे अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.



तालुक्यातील चिरोली, जानाळा येथील बरेच तर, मारोडा परिसरातील मोठ्या प्रमाणात, वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात आला तर या परिसरातील पाणीपुरवठा , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित कोळसा व इतर गावांनाही वीज पुरवठा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितलं.

कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पहिल्यांदाच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवांर ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, वीज वितरण कंपनीचे मुख्य महाप्रबंधक पॉवर ग्रीड भद्रावती, अरिन्दम सेन शर्मा,कार्यकारी अभियंता पारेषण प्रमुख, हरिश्चंद्र बालपांडे,आदि मान्यवर उपस्थित होते.

मानवाच्या अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या परंतू आता यासोबतच विजेचा पुरवठा हीदेखील आवश्यक गरज झाल्याचे मान्यवरांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले.

भविष्यातील पिढीसाठी वीज बचत करून ठेवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोळश्यावर तयार होणारी वीज आपण पिढ्यानपिढ्या पुरवू शकत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सौर ऊर्जा, पवण ऊर्जा, जल ऊर्जा, बायोमक्स ऊर्जा, अशिष्ट ऊर्जा,अक्षय ऊर्जा,अशी विविध विजेची निर्मिती करण्याचे भारत सरकारचे स्वप्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मूल शहरात २४ की. मी. अंतराची विजेची अंडरग्राऊंड पाईप लाईन करण्यात आली.त्याबाबत ग्राहकाच्या उत्तम प्रक्रिया आहेत. त्यामुळे लाईन जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.असे मूल येथील उपअभियंता चंदन चौरसिया यांनी सांगितले.

आयोजित कार्यक्रमात वीज लाभार्थी ग्राहकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.चंद्रपूर येथील कलाकाराच्या वतीने विजची बचत आणि त्याचा योग्य वापर यावर पथनाट्यामधून उपस्थितांना संदेश देण्यात आला.

यावेळी बालविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोंडी पारंपरिक नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार एस. एन. कुर्रा यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया, सहाय्यक अभियंता पंकज उजवने, मनोज रणदिवे आणि मूल येथील कार्यालईन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.मोठ्या संख्येने परिसरातील वीज लाभार्थी ग्राहक,  सरपंच, उपसरपंच ,सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*