महावितरणच्या वतीने ग्राहक हित जोपासण्यासाठी....

 महावितरणने वर्षभरात पोहोचवली २६ हजार ६७६ ग्राहकांच्या जीवनात वीज

३ हजार ३८९ कृषिपंपांचीही तृष्णा भागली

उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) अंतर्गत  बसविले ४ हजार ८ रोहित्रे 

या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ५६ शेतशिवारात वाहू लागले खळखळून  पाणी


चंद्रपूर ,दीपक देशपांडे.

   महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात १ एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीत नविन २६ हजार ६७६ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात १४ हजार ९८३ तर गडचिरोली मंडळातील ११ हजार ६९० ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून या सर्वांच्या अंगणात वीजरूपी प्रकाश पोहचला.

    ग्राहकांच्या जीवनात प्रकाश पोहोचविण्याचे काम पार पाडले आहे. एप्रिल महिन्याच्या २ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी ६ गरीब घरी प्रकाशाची किरणे पोहचवित महावितरणने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दिवसा सूर्यादेवाने भरभरून दिलेला प्रकाश तर  त्याच सूर्याप्रकाशामुळे  चंद्रपूर सारख्या उष्ण शहरात सोसाव्या लागणाऱ्या उन्हाच्या झळा. चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघालेल्या कित्येक रात्री चंद्राला धन्यवाद देत..तर कृष्णपक्षाच्या अंधाऱ्या रात्री तेलाच्या दिव्यात.... सरपटणारे विंचू, साप, कीटक यांची भीती उराशी बाळगून काढलेल्या. गरिबीत जीवन कंठत आलेल्या सहा गरिबांच्या जीवनातील अंधारास गुढीपाडव्याचा मुहूर्तावर महावितरणने प्रकाश पोहोविला,


 देण्यात आलेल्या या लघूदाब वीजजोडण्या 

चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर मंडळात घरगुती १७ हजार ५२२, वाणिज्यिक ३ हजार ९९७, औदयोगिक ५०५ , सरकारी कार्यालये २८६, पाणिपुरवठा १४३, पथदिवे ७५, कृषिपंप ३ हजार ३८९, कुक्कूटपालन ४१, इतर लघूदाब ७१५ अशा एकंदरीत २६ हजार ६७३ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.

चंद्रपूर मंडळात घरगुती १० हजार १४०, वाणिज्यिक २ हजार ८९३, औदयोगिक २९७, सरकारी कार्यालये १२७, पाणिपुरवठा १०१, पथदिवे ४८, कृषिपंप १ हजार १६२, कुक्कूटपालन २६, इतर लघूदाब १८९ अशा एकंदरीत १४ हजार ९८३ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.

तर गडचिरोली मंडळात घरगुती ७ हजार ३८२, वाणिज्यिक १ हजार १०४, औदयोगिक २०८, सरकारी कार्यालये १५९, पाणिपुरवठा ४२, पथदिवे २७, कृषिपंप २ हजार २२७ , कुक्कूटपालन १५, इतर लघूदाब ५२६ अशा एकंदरीत ११ हजार ६९० वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.  तसेच

केंद्र शासनाच्या अतिमहत्वकांक्षी अशा उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत या योजणेच्या सुरुवतीच्या वर्षापासून म्हणजे २०१८ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या देण्याचे आतापर्यंतचे निर्धारीत लक्ष पूर्ण करीत  


चंद्रपूर मंडळात २ हजार ५५१ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून २ हजार ५८४ वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात हे काम ९८.३१ टक्के पूर्ण झाले असून ३१ मे २०२२ पर्यंत १०० टक्के वीजजोडण्या देण्यात येतील . तर

 गडचिरोली मंडळात, १ हजार ४५७ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून १ हजार ४७२ वीजजोडण्या देण्यात आल्या. गडचिरोली मंडळात हे काम १००  टकके पूर्ण झाले आहे. 

अशाप्रकारे उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार ८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ५६ वीजजोडण्या देण्यात आल्या.अशी माहिती मुख्य अभियंता सुनील देशपांडे व जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली आहे.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*