Posts

*कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सतरावी बैठक संपन्न*

Image
 *कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सतरावी बैठक संपन्न*  *मूल १६* : दीपक देशपांडे    कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *सतरावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक १६ मे २०२४ रोजी ग्रामपंचायत *चिखली ता. मूल जि. चंद्रपूर* येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल चे *सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, उपसरपंच श्री. दुर्वास कडस्कर,*  शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “खरीप पिकांचे नियोजन” या विषयावर चर्चा करण्यात आली.  यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी त्यांनी तांत्रिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांना पटवून सांगितले तसेच गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचे व पंदेकृवि विकसित विविध पिकांच्या वाणांची लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले व शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबंधित विषयावर साधक बाधक चर्चा केली. *डॉ. विजय राऊत,* कृषि विद्या शास्त्रज्ञ यांनी खरीप पूर्व हंगामचे नियोजनाविषय

गावातील वादातून वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात!

Image
  बिग ब्रेकिंग :- गावातील वादातून  वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात! आरोपीला१५दिवसांची न्यायालयीन कोठडी,तर सहकाऱ्याला मिळाली जमानत. मूल, चंद्रपूर,दीपक देशपांडे  चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील उथळपेठ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील विद्यूत प्रवाहाने झालेली वाघाची  शिकार लपविण्यासाठी त्याची परस्पर विल्हेवाट लावली होती , आणि ही बाब चर्चेतही आली नव्हती. मात्र नुकतेच एका प्रेमप्रकरणातूनआरोपीचा  एका व्यक्तीसोबत वादविवाद झाला आणि त्याचा वचपा काढण्यासाठी त्या व्यक्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या गुप्त माहितीनुसार वनाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. अशी गावात चर्चा ऐकायला मिळाली, आणि...... चंद्रपुर वनविभागा अंतर्गत चिचपल्ली वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र मूल,नियतकक्ष चिरोली अंतर्गत नलेश्‍वर येथे दिनांक ०६/०५/२०२४ रोजी वनाधिकाऱ्यांना सुरेश विठठल चिचघरे. उथळपेठ यांनी कक्ष क्रमांक ५५/२ खाजगी  शेतात लावून ठेवलेल्या जिवंत विद्युत प्रवाहानेव  वन्यपाणी वाघाची शिकार झाली व मृत वाघाचे तुकडे करून त्यांचे मृत शव जाळुन जमिनीत दफन केल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीनुसार    वनाधिकाऱ्यांनी सुरेश विठ्ठल

मूलच्या बसस्थानकावर चामोर्शीच्या महिलेने गमावलेले धन सावलीच्या महिलांनी स्वयंप्रेरणेने परत दिले.

Image
मूलच्या बसस्थानकावर चामोर्शीच्या महिलेने गमावलेले धन सावलीच्या महिलांनी स्वयंप्रेरणेने परत दिले. गौरवास्पद कामगिरी. *मूल, चंद्रपूर दीपक देशपांडे* सावली येथील सौ. किर्ती योगेश्वर शेंडे व सौ. कुंदा जगदीश लेनगुरे या दोघीजणी मूल बसस्थानकावर सावलीच्या बसची वाट पाहत असतांना त्यांना एक बेवारस पर्स मिळाली. पर्स कुणाची आहे म्हणून चार चौघांना विचारणा केली मात्र सावली ची बस लागल्याने पर्स घेऊन या दोघीजणी गावाकडे परत येत असतांना त्यांनी पर्स उघडली तर त्यात ३ तोळे सोने,मोबाईल व ३५०० ₹. दिसले, आणि त्यांना धक्का बसला.त्यामुळे या दोन्ही महिलांनी बस मधूनच फोन वर सावली येथील शांतता कमिटीचे सदस्य तथा माजी सरपंच अतुल लेनगुरे यांना माहिती दिली व घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर अतुल लेनगुरे यांनी सावली चे ठाणेदार राजगुरू यांना माहिती दिली व कुणाची असेल किंवा तक्रार आल्यास त्वरित कळवा असे सांगितले. त्यानंतर १५ मिनिटातच मूल पोलीसात पर्स हरविल्याची माहिती आली आणि त्यांनी त्वरित सावली ला आलेल्या वस्तूची ओळख परेड झाल्यावर ती पर्स व वस्तू  सौ.सोनाली गणेश जम्पलवार मु. भेंडाळा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांची असल

सीबीएसई दहावीचा निकाल:-मूलच्या सेंट अँस कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची शतकी सलामी.

Image
  सीबीएसई  दहावीचा निकाल:-मूलच्या सेंट अँस कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची शतकी सलामी. ईशान राचर्लावार मूल –दीपक देशपांडे    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च, २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. मूलमधील शाळांमधून २० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २०  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत… शहरातील श्रीमंतांची शाळा म्हणून ओळख असलेल्या या शाळेच्या  उत्तीर्ण  विद्यार्थ्यांची टक्केवारी  १००टक्के आहे. Riya Mahadane,            Shivam Kundawar.                    ,Naitik Agarwal 93%.                         92.6%                                             91% हे आहेत काही उत्तीर्ण विद्यार्थी . ईशान संतोष राचर्लावार  यांस इय्यता १० वी च्या  परीक्षेत ९६.०४ % टक्के गुण प्राप्त झाले,त्याला मिळालेल्या अतुलनीय यशाबद्दल आणि मुल तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल ईशानचे अभिनंदन !आणि शाळेच्या  उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खुप – खुप शुभेच्छा  दिल्या जात आहेत त्याचवेळी  गाव खेड्यातील

*लपलेलं ते गवसलं.....भाग १ ""त्या" आगीचे नेमके रहस्य काय?

Image
  *लपलेलं ते गवसलं.....भाग १.* "त्या" आगीचे नेमके रहस्य काय? चंद्रपूर, दीपक देशपांडे  सगळीकडे   निवडणूक  धामधूम ,व मतदानाची तयारी  सुरू असतानाच पोलिस व प्रशासकीय चोख बंदोबस्त असतांनाच अठरा एप्रिल च्या मध्यरात्री म्हणजेच  १९ एप्रिल रोजी १२-१२.३०  वाजता   लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या ग्राहकतक्रारनिवारण आयोगाच्या इमारतीच्या मागील भागात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे ,तेथे परिसरातील छोटेमोठे झाडे तोडून काही लाकडे ढिग लावून तर बरीचशी इतस्ततः पसरलेली आहेत,त्याठिकाणी आग लागून झालेल्या शार्ट सर्किटमुळे चंद्रपूर ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे  सर्विस लाईनसह इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची आकडेवारी मात्र कळू शकली नाही. एरवी छोटीशी घटना घडली तरी त्याचा मोठा इश्यू केला जात असतांना या एवढ्या मोठ्या घटनेबाबत, पहिल्या दिवशी हात झटकू बघणाऱ्या बांधकाम विभाग, विज वितरण कंपनी आणि जिल्हा प्रशासन  यांनी धावपळ करुन अतीशिघ्रतेने आगीने जळालेले  मिटर बदली करुन ,केबल व कनेक्शन सह दुरुस्ती का

रखडलेले लिलाव!रेती उपसा!!रेतीची तस्करी!!!आणि..... बांधकाम व्यवसाय??

Image
  रखडलेले लिलाव! रेती उपसा!!रेतीची तस्करी!!!आणि... सुस्ता- -वलेला बांधकाम व्यवसाय?? दीपक देशपांडे  महाराष्ट्र शासनाने विगत कित्येक महिन्यांपासून रेतीघाटांचे लिलाव न केल्यामुळे रेती पुरवठा करणारे, बांधकाम कंत्राटदार, बांधकाम करणारे नागरिक ,यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असून बांधकाम व्यवसाय सुस्तावला असल्याची ओरड सर्वत्र सुरु आहे म्हणजे तसा दिखावातरी नक्कीच केला जात आहे. याबाबत नुकतेच मूल येथील महसूल प्रशासनाच्या भरारी पथकाने शनिवारी सकाळी मूल तालुक्यातील मारोडा पेटगाव मार्गावरील उमानदी पात्रात अवैधरीत्या ट्रॅक्टरने रेती वाहतूक करण्याच्या  प्रयत्नात असलेल्या चार  ट्रॅक्टरला घटनास्थळी पकडून त्या चार ट्रॅक्टरला मूल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आणि पून्हा एकदा रेती तस्करीचा एक मुद्दा चर्चेत आला आहे. खरेतर रेती तस्करीचा मुद्दा गेले अनेक महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात कुठे ना कुठे  कायमच  चर्चेत राहिला आहे , परंतू त्यावर प्रतिबंधात्मक ठोस कारवाई कुठेही होताना दिसत नाही ,तर आम्ही किती सतर्क आहोत हे दाखवण्यासाठी कधी महसूल विभागातर्फे तर कधी पोलिस विभागाच्या वतीने एखाददुसरी कारवाई केली

*आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करण्याची पुरोगामी संघटनेची मागणी*

Image
*आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करण्याची पुरोगामी  संघटनेची मागणी* मूल, चंद्रपूर दीपक देशपांडे  सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पवित्र पोर्टल ची भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर भारमुक्त करण्याचे शासनाचे निर्देश होते पण लगेच लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागल्याने आंतरजिल्हा बदली शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले नाही. शासनाने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करुन त्यांना पदस्थापना देण्याचे नियोजन केले आहे व काही जिल्हा परिषद ने पदस्थापना केलेली आहे. आपल्या गावापासून नोकरीसाठी कोसो दूर आलेले शिक्षक कुटूंबापासून बरीच वर्ष विभक्त राहिले आहेत. शासनाच्या ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने त्यांची गावाकडे नोकरी करण्याची स्वप्न पूर्ण होत आहे पण आचारसंहितेच्या अडवणूकीने काही  काळासाठी स्वप्न धुसर झालेली आहेत. आपल्या गावाकडे बदली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असताना आचार संहितेने खोडा घातल्यामुळे भारमुक्त होण्यास ४ जुन २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरीत भारमुक्त करुन त्यांना स्वजिल्ह्यात जाण्याची व पदस्थापना घे